पान:माधवनिधन.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जून १८९९] माधवनिधन. सत्यभामा–कारण मला सांगितल्याप्रमाणे योगायोग जुळून येतात ह्मणन ! त्याशिवाय श्रीमंत बाजीरावसाहेब पेशवे आपल्याकडे चालून आले असते का? बलवंत-( आपल्याशी ) ही ह्मणते तेंही काही खोटं नाही! ( उघड ) असो, तुला सांगितलेलं खरं की मला सांगितलेलं खरं, याबद्दल विचार मुळीच करूं नये. जे होईल तें खरं ह्मणून स्वस्थ बसावं झालें.. -सत्यभामा-मला सांगितलेलं कधीच खोटं व्हावयाचं नाही. कारण आमच्याइतका आपला कोणावर विश्वासच नसतो. देवधर्माची व विश्वासाची बाजू आमची, आणि उलाढालीची आपली. श्रीमंताच्या बोलण्यांत आपल्याविषयी किती प्रेम व कळकळ दिसत होती. दैवयोगानं त्यांचे चांगले दिवस आल्यावर ते आपल्याकरितां काय करणार नाहीत ? प्रसंगी ते आपणाला, ज्या नानांनी आपली येथे पागेदारीच्या जागेवर नेमणूक केली आहे, त्यांच्याच जागी नेऊन कशावरून नाही बसविणार? चुलत्या पुतण्याचे चांगलं जमल्यावर काय होणार नाही ? शिवाय आपण पूर्वी दादासाहेबांच्या पागेंत नव्हता का ? मग त्यांच्या चिरंजिवाचं ह्मणणं ऐकायला काय हरकत आहे. बलवंत-पण यामुळे नानांचा विश्वासघात केल्यासारखं नाहीं कां होत ? त्याचा विचार केला पाहिजे. नानांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे; व त्यांनी मला नीट बंदोबस्तानं रहा, त्यांच्यावर चांगली नजर ठेव, असें वारंवार बजावून सांगितलं आहे. सत्यभामा-नाना आणि आपण उभयतांही पेशव्यांचे चाकर! ते सर्व पेशवाईचा कारभार करतात आणि आपण शिवनेरी किल्ल्याचा करता. ते एका धन्याची चाकरी बजावतात, आणि आपणाला पर्यायानं दोन्ही धन्याची चाकरी अनायासें बजाविता येते. एवढंच आपणां उभयतांत अंतर! आज जरी ते निराळे आहेत, तरी ते पुढे मागें एक होणारच. दोन्ही धन्यांची जर उत्तम रितीनं चांगली चाकरी बजाविली तर दोन्हीकडून चांगला फायदा नाहीं कां व्हावयाचा ? खास होईल. आपण गरिबांनी दुसऱ्या इतर गोष्टीपेक्षा आपल्या स्वतांच्या फायद्याकडे जास्त लक्ष द्यायला नको कां ?