पान:माधवनिधन.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. वर्ष ७ हे मला सुचत नाही, माझ्या मनाचा अगदी गोंधळ उडून गेला आहे, आणि त्याचमुळे मला आज स्वस्थ झोप येत नाही. ज्याअर्थी तूं सर्व ऐकलं आहेस, त्याअर्थी आतां तूंच मी काय करावं ते सांग ! इकडे श्रीमंत बाजीरावसाहेबांची भीड तुटत नाही, आणि तिकडे नानांचा विश्वासघात करवत नाही. मोठी पंचाईत येऊन पडली आहे. खरं--मटलं-तर सत्यभामा--या एवढ्याशा गोष्टींचं आपल्याला एवढं मोठं गूढ काय पडलं, हे वाई मला कळत नाही. श्रीमंत बाजीरावसाहेब पेशवे आज · पुन्हां आपल्या घरी चालून आले, त्यांनी आपली विनवणी केली, मोकळ्या ) मनानं आपल्या सर्व गोष्टी आपल्याजवळ सांगितल्या, आपल्याला एवढा मान । दिला, आणखी त्यांनी काय बरं करावं ? सध्यां जरी ते बंदीवासांत आहेत, तरी कसे केले तरी ते श्रीमंत दादासहेब पेशव्यांचे पुत्र ना ? आणि श्रीमंत सवाई माधवरावसाहेब पेशव्यांचे चुलते. केव्हां तरी ते एक झाल्याशिवाय राहणार नाहीत. मग थोडक्याकरितां त्यांची मर्जी आपण कां मोडावी. अनायासं चांगुलपणा व मोठेपणा मिळतो आहे तो हातचा कां दवडावा. यामुळे केव्हां तरी आपला भागोदय होईल खास ! आणि जोशानं देखील असंच सांगितलं आहे. बलवंत-कोणी, वैननाथभटनीनी कां ? आणि त्यांनी तुला काय सांगितलं आहे. सत्यभामा--काय ह्मणने, की यंदा ग्रह चांगले आहेत, राजयोग उत्तम आहे. दरबारांत मोठी बढती मिळणार ! बलवंत हे त्यांनी तुझ्या पत्रिकेवरून सांगितलं की माझ्या ? मी दुसऱ्या जोशाला जेव्हां वर्षफळ काढण्याकरितां पत्रिका दाखविली होती. तेव्हां त्यानं मला ' राजयोग चांगला आहे, पण थोडेसे ग्रह अनिष्ट आणि पीडा देणारे आहेत' असं सांगितलं होतं; आणि तूं तर सगळंच चांगलं ह्मणतेस. तेव्हां खरं कोणचं, हे की तें? . सत्यभामा--खरं, मी सांगते हे खरं ! बलवंत-आणि आमचं खोटं कशावरून ?