पान:माधवनिधन.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जून १८९९] माधवनिधनः सत्यभामा--हे पहा, किती जरी माझ्याशी उडवा उडवी केली तरी, हे तापलेलं डोकं, ( त्याच्या डोक्याला हात लावते. ) ही भ्रांतिष्टासारखी नजर, या कपाळावरच्या आंठ्या, हा त्रासिक झालेला चेहरा, आणि स्वस्थ झोप न आल्यामुळे हे ऊन झालेलं अंग, इकडच्या मनाची स्थिती कळवितात. या गोष्टी कांही आपल्याला खास लपवितां येणार नाहीत. त्याच आपलं चित्त आज स्वस्थ नाही हे दाखवित आहेत. मग ही माझ्याशी कां बरं चाळवा चाळवी ! आपल्या मनांत काय घोळत आहे, हे जर आपण मला सांगितलं तर, त्याला मला जर काही उपाय सुचला तर मी सांगेन. तो माझा उपाय जर आवडला तर व्यावा, नाहीतर द्यावा आपला सोडून ! आणखी हेच खरं की, विचार करकरून डोकं भणभणून गेलेल्या मनुष्याला आपल्या मनाचं समाधान होईल असे विचार निदान त्याला त्यावेळी तरी सूचत नाहीत; आणि सूचले तरी ते आवडत नाहीत; त्यामुळे मनाचं समाधान होत नाही, आणि मग ही अशी तळमळ लागते. फार करून श्रीमंत बाजीरावसाहेब पेशवे आज पुन्हां आपल्याकडे आपणहून आले होते, त्यांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या, त्याबद्दल आपण आज विचार करीत आहोत, असे आपलं मला वाटतं.. बाकी खरं काय ते आपलं आपल्यालाच माहित. पण फार करून जर खरं सांगणं झालं तर माझा तर्क कांहीं खोटा होणार नाही, असे मला वाटतं. __बलवंतराव-( हांसून ) हे तूं कशावरून ताडलंत ! ही लोकांच्या मनातून गुह्य काढून घेण्याची कला तूं केव्हां शिकलीस ! सत्यभामा-त्यांत कला कसली. इतक्या सहवासानं आपल्या मनप्याचा जर आपल्याला स्वभाव कळला नाही, तर मग काय राहिलं ? आणखी आज असं मन अस्वस्थ होण्याला त्या गोष्टीशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टी झाल्या नाहीत. आणि त्यालाही मगजे फार वेळ झाला असं नाही. तेव्हां त्याच फार करून असाव्या, असा मी आपला त बांधला. एकूण माझा तर्क खरा झाला तर ! बलवंत-होय, त्याच गोष्टी माझ्या मनांत घोळत आहेत; काय करावं