पान:माधवनिधन.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. वर्ष ७ आहे की, आपल्या कपाळी राज्यपद आहे ह्मणून. सध्या तर मी कैदखान्यांत आहे. श्रीमंत सवाईमाधवराव, पेशव्यांच्या मसनदीवर विराजमान होऊन आज वीस वर्षे राज्य हांकीत आहेत. तेव्हां पेशवाईची गादी मला मिळणं हैं जितकं सध्यां शक्य आहे, तितकंच माझी येथून सुटका होणं हेही शक्य आहे. माझ्या नशिवी बंदीवास कायमचा आहे हेच खास ! पण नुसतं माशा मारीत बसणं बरोबर नाही. नशीब पंगु आहे. त्याला आपण प्रयत्नानं चालविलं पाहिजे. नशिबावर नुसता हवाला देऊन स्वस्थ . बसणारे लोक फार करून फसतात असें ह्मणतात, तेव्हां आतां हात पाय हालवून काय होतं ते पाहिलं पाहिजे. माधवरावांचा आमच्याकडे ओढा कितपत लागत चालला आहे, त्यांचं मन आमच्याविषयी कसं होत चाललं आहे; वगैरे गोष्टी युक्तीनं मला काढून घेतल्या पाहिजेत; आणि तेवढ्याकरितां फराळ झाल्यानंतर मला त्या बलवंतराव नागनाथाची प्रथम भेट वेतली पाहिजे. पाहूं काय होते तें. . (जातो.) म . प्रवेश दुसरा. स्थळ-बलवंतराव नागनाथाची खोली. पा--बलवंतराव नागनाथ आणि त्यांची स्त्री सत्यभामा. सत्यभामा--अगबाई, इतकी रात्र झाली तरी आज झोप कशी येत नाही. फराळ झाल्याबरोबर आंथरुणाला पाठ लावण्याचाच कायतों अवकाश असतो, लागलीच गाढ झोप लागते, आणि आज का या कशाच त्या कुशीवर तळमळणं चाललं आहे. कांहीतरी असलं पाहिजे. त्याशिवाय अस कधीच होत नाही. मध्यरात्र उलटून गेली तरी झोप लागत नाही, असं आपल्या मनांत आज काय मोठं घोळतं आहे. ते मला सांगितलं पाहिजे. बलवंतराद--कांहीं नाहीं ग ! उगीच आपला पडलों आहे. गोद