पान:माधवनिधन.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जून १८९९] माधवनिधन.. आप्पा--मग उद्यां खचित चलाल ना ! मी उद्या सकाळी रोजच्यापेक्षा लवकर उठून, तुह्मालाच पहा उठवायला येईन. न बाजीराव--येईन बरं बाळ ! खाम येईन. जा, आता हा पोषाक उतरा, संध्या करा, आणि जेवा. फेरफटका करून आल्यामुळे तुला फार भूक लागली असेल, जा. TARAT आप्पा--तुम्ही बरोबर असल्यावर मग पाहीन तो. राणोजी मला कसा बाहेर जायला नाहीं मंगतो तें. उद्यां मग गंमत--मौज--चंमत. अंः [उड्या मारीत व चाबूक फडकावित निघून जातो.] बाजीराव--( तो गेलासे पाहून ) 'न जाणो आपल्यामागे पुण्यास यांनी कांहीं घोंटाळा केला तर, ' या संशयाने त्या थेरड्यानं खरड्याच्या लढाईला जाण्यापूर्वी आह्माला आनंदवल्लीहून आणून या ठिकाणी ठेविलं, व आमचा पूर्वीपेक्षाही जास्त कडक बंदोबस्त केला; की, आझाला कुठंही इकडे तिकडे फिरकतां येऊ नये. ती गोष्ट आज या आप्पालाही थोडीशी समजली. रघुनाथराव दादासाहेबांच्या वंशजांना या किल्ल्याबाहेर फिरण्याला यःकश्चित पागेदाराचा हुकूम पाहिजे अंः ! हुकूम ! चाकरानं धन्यावर हुकूम चालवावा, बाहेरच्या भुट्टेचोरांनी आमच्या घरांत घुसन, आमचे लुबाडून घेऊन उलटा आमच्यावर त्यांनी कडक अंमल गाजवावा, अशीच सध्यां उलटी वेळ आली आहे. त्या आप्पा पोराचें तें रडवं तोंड पाहिल्याबरोबर पोटांत कसं ढवळून आलं. त्याच्या रडण्याचं कारण समजल्याबरोबर अंगाची अगदी आग होऊन गेली. पण काय करणार कांहीं इलाज नाही. [ स्वस्थ बसून ] नानाच्या बंदीखान्यांतच आह्मी कुजून कुजून मरणार अंः ? त्यांतून मोकळं मुट्न आम्ही आपला प्रभाव, व आम्ही बाजीरावसाहेब, पेशव्यांचे वंशज आहोत, असं आमाला सगळ्या जगाला दाखविता येणार नाही काय ? हो, येईल, पण केव्हां, जेव्हां आम्ही या कारागृहांतून सुटूं तेव्हां; आणि तें--तें तर नाना किंवा आम्ही दोघेही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत होणं अगदी अशक्य. मग शक्य काय ? आमच्या कपाळी बंदीवास हेच खरं !' असं असन वैजनाथमट भागवत यांनी माझी पत्रिका पाहून मला सांगितचं