पान:माधवनिधन.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. वर्ष ७ आमचे दुर्दैव. [ उघड ] होय बाळ आप्पा, मी त्याला हुकूम दिला होता. घोडा बाहेर निघून बेफाम होऊन गेल्यावर 'तुला आवरेनासा झाला, त्यानं तुला पाडलं, ह्मणजे मग कसं करायचं; ह्मणून मी त्याला तुला बाहेर न जाऊं देण्यास सांगितलं होतं. उद्यां तूं आणि मी दोघेजण बरोबरच जाऊं अंः ! रडूं नकोस अं! आप्पा-बाबासाहेब, खरं ना पण ! पहा मग मी आपला घोडा तुमच्या बरोबर भरधाव फेंकतों की नाही ते ! मी आपला घोडा तुमच्यापुढे घालवीनं. चला, तुमची आमची शर्यत! मी जर उद्या तुमच्यापुढे घोडा भरधाव काढला * तर मग तुह्मी मला काय बक्षिस घाल ! सांगा. बाजी--देऊं थोडासा खाऊ! आप्पा--खाऊ नको जा आह्माला ! मी तुमचा तो सांरगा घोडा घेईन. अं---अं--अं. बाजी--बरें बोवा, आमी तुमाला आपला सांरगा घोडा देऊं, मग तर झालं ना! आप्पा-पण तुह्मी किल्ल्याच्या बाहेर माझ्यावरोबर आलं पाहिजे. इथं जागा लहान आहे. मोठे चांगले पटांगण नाही, आणि बाहेर जशी घोडा फिरविण्याची मौज आहे तशी किल्ल्यांत नाही. आमी आनंदवल्लीहून येथे आल्यापासून कधीच किल्ल्याच्या बाहेर गेलो नाही. इथं अगदी कोंडल्यासारखं वाटतं. बाबासाहेब तुझी देखील कधी बाहेर गेला नाही. गेला होता कां कधीं ? बाजीराव--( आपल्याशी) आपल्यापाठीमागे तो नाना फडणवास शनिग्रह हात धुवून लागला आहे, तो कुठं आपल्याला स्वस्थ बसू दता आहे. त्याचेच हे सर्व खेळ चालले आहेत. त्याचे खेळ सध्यां तुला कळत नाहीत हे फार चांगले आहे, नाहीतर संतापानं सध्यां जसा मी आतल्या आंत जळत आहे, तसं मग तुला होईल, आणि तुझी खरी स्थिती तुला कळू लागली झणजे मग तुला हे खेळ मुळांच मुचणार नाहीत..