पान:माधवनिधन.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- जून १८९९ ] माधवनिधन. [इतक्यांत हातांत चाबूक घेतलेला असा चिमणाजीआप्पा रडत रडत येतो.] सचिमणाजीआप्पा-(रडत रडत ) बाबासाहेब बाबासाहेब-मी किनई आज किल्ल्याच्या बाहेर-अं-अं--अं बाजीराव --ये, ये, आप्पा-ये-बाळ तूं रडतोस कां ? [ त्याला जवळ घेतो. ] तूं घोड्यावर बसून बाहेर फेरफटका करायला गेला होतास ना ? मग काय झालं ! घोड्यावरून पडलास होय ! पाहूं कुठं लागलं तें. ____आप्पा–बाबासाहेब, मी घोड्यावरून पडलों नाहीं कांही. मला आतां चांगलं बसतां येतं. मी आतां वाटेल तसा घोडा भरधाव टाकतो. एका हातांत माझा लहान माला घेऊन सुद्धा-अं-अं वाजीराव-[ त्याच्या तोंडावरून हात फिरवून ] अरे वा, तर मग तूं मोठा घोड्यावर बसणारा पटाईत झालास ह्मणायचा ! बरे पण आप्पा तूं रडतोस कां ? आप्पा-मी किनई बाबासाहेब, आज किल्लयाच्या बाहेर घोड्यावर बसून फिरायला जाणार होतो, किल्ल्याच्या बाहेर जो पडतों, तो आपला रोजचा राणोजी स्वार आमच्या बरोबर असतो तो ह्मणाला, आप्पासाहेब, किल्ल्याच्या बाहेर जायला आपल्याला हुकूम नाही. बाहेर किनई बाबासाहेब मोठी मौज होती, ती माझ्या मनांतून फार पहावयाची होती; मी तसाच जात होतो, तो त्यानं माझा घोडा धरून मागं फिरविला. बाबासाहेब आमची मौज गेली. अं-अं--अं--आतां आमी काय करावं. त्या राणोजीनं कां माझा घोडा परतवला ? किल्लयाबाहेर जायचा हुकूम नाही, असं तो ह्मणाला. तेव्हां किल्लयाबाहेर जायला आमाला कोणाचाहो हुकूम पाहिजे. बाबासाहेब तुझी हुकूम दिला होता होय. अं-अं--आमची गंमत गेली अं--अं-आह्मी उद्या जाणार ! अं--अं. बाजीराव-( आपल्याशी रागानें ) भगवा झेंडा व नागवी समशेर हातांत घेऊन सर्व हिंदुस्थानभर भराऱ्या मारणाऱ्या रघुनाथराव दादासाहेबांच्या या लहानशा छबकड्यांना, किल्लयाबाहेर नुसता घोड्यावरचा. फेरफटका करण्यास सुद्धा जातां येऊं नये ना ! कोण हा बंदीवास ! आणि कसले हैं