पान:माधवनिधन.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ मानून घेण्याला तरी जागा होती; पण सध्यांची आमची स्थिती त्याहून किती तरी भिन्न आहे! कोणत्याही आमच्या शत्रूचे आह्मी शत्रू नाही, आमी कोणत्याही लढाईत पाडाव झालों नाही, व तसं आमचे कोणाशीही प्रत्यक्ष वैर नाही, कांहीं नाहीं; पण त्या नान्या फडणविसाचे, ह्मणजे पेशव्यांच्या चाकराच्या एका कारकुनाचे, आमी रघुनाथराव दादासाहेबांचे पुत्र ह्मणून यःकश्चित् कैद्यापेक्षां देखील कैदी होऊन राहिलो आहोत. भल्या मोठ्या हातापायांत वजनदार बिड्या घातलेला, व सर्व दिवसभर सक्त मजूरी करणान्या कैद्यालासुद्धां जी थोडीशी स्वतंत्रता असते, ती देखील आझाला नाही. किल्लयाच्या बाहेर कशाला, या वाड्याच्या देखील बाहेर फिरण्याला आमाला आमच्या चाकराच्या चाकराची परवानगी लागते !! कोणाशी बोलायचं झालं, तरी देखील आझाला ह्मणने पेशव्यांच्या वंशजांना-ज्यांचा साऱ्या हिंदुस्थानभर हुकूम चालतो त्यांना त्यांना--यःकश्चित येथील पागेदाराचा हुकूम लागतो. परक्याशी बोलण्याला जशी आमाला परवानगी नाहीं, तशी ( इकडे तिकडे पाहून ) आझाला आमच्या मनाशी देखील मोठ्याने बोलण्याची परवानगी नाही. कारण आमच्या तोंडांतून रागाच्या आवेशांत भलतेच कांहीं बाहेर पडलं तर, त्याचा परिणाम काय होईल याची आमाला क्षणोक्षणी भीति असते. आमची अशी दशा करण्याला त्या थेरड्याला सबळ कारण काय, तर आह्मीं रघुनाथराव दादांचे व आनंदीबाइचे पुत्र, त्यांचे वंशज, आणि नानासाहेब पेशव्याचे नाही एवढेच. (दांत आठ चावतो ) अरेरे नान्या, थेरड्या, काय करूंरे. तुझी देखील अशीच स्थिती करीन. [ थांबून ] पण केव्हां, पुढे ना ! छे, छे, मी अगदी वेडा. जे आपण उद्यां करूं ह्मणून ह्मणतो, तें खरं होणार असें ह्मणणे गाँणने केवढी चक ! सध्यां में होत आहे तेच खरे; आणि ह्मणूनच सध्यां मो त्या थेरड्या नानाफडणविसाचा बंदीवान आहे हेच खरं. सध्यां मला नुसतं हात पाय आपटण्याखेरीज, व मनातल्या मनांत संतापण्याखेरीज दुसरं काय करता येतं आहे. काही नाही. नशिबावर हवाला वन स्वस्थच बसलं पाहिजे.