पान:माधवनिधन.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ८ मोठी. उमेद होती, पण ती पार खचून गेली. रघुनाथराव, आनंदीबाई, आणि त्यांच्या पुढील वंश याबद्दल माझी जी कल्पना होती ती खरी ठरूं नये, त्या विषवल्लीचा नुसता संसर्ग देखील होऊ नये, या नवीन लावलेल्या रोप्याला कीड लागू नये एवढ्याचकरितां मोठ्या दक्षतेने त्याच्यावर नजर ठेविली असतां, अखेरीस त्या विषारी किडीनं तो रोपा पार खाऊन टाकला. माझे हेतू त्यांना कळाले नाहीत. निव्वळ गैरसमजुतीचा हा दुर्धर परिणाम होऊन या वृद्धावस्थेत माझ्या तोंडाला काळं लागलं. बापू तुमची केवढी पुण्याई, तात्या तुझी केवढे भाग्यवान, पाटीलबोवा तुमचे नशीब केवढं थोर, सुभेदार तुझी दैववान ह्मणून तुह्मा सर्वांना हा आजचा दुर्दिन पाहण्याची पाळी आली नाही! बापू ऐन आणिबाणीच्या प्रसंगी मला धैर्य देऊन तुझी चांगली मसलत दिलीत, तात्या, पाटीलबोवा, सुभेदार, तुझी सर्वांनी मोठमोठ्या प्रसंगी मराठी राज्याकरितां निवापाड श्रम केलेत आणि माझी प्रत्येक वेळी पाठ राखलीत, पण आतां असल्या भयंकर प्रसंगी मला योग्य सल्लामसलत कोण देईल, आणि माझी पाठ तरी आतां कोण राखील. तुमचे सर्वांचे देह मराठी राज्याच्या वृद्धीकरितां खर्च झाले, तुझी सर्वनण अखेरी उत्तम साधन अक्षय्य स्वर्गसुख भोगण्यास चालते झालांत आणि मला पाप्याला हा दिवस पाहण्याकरितां मागे टाकलेतना ? अहो माझी सर्व धनदौलत, माझे प्राण, सर्व महाराष्ट्रातील सं. पत्ती, सर्व मराठी राज्य वाटेल तें ध्याहो, पण माझे श्रीमंत, माझे य नमान मला कोणी परत द्या, निदान त्यांचे मला एकदां हास्यमुख तरी पाहू द्या. त्यांच्या चरण प्रतापाने सर्व मराठी राज्य जरी गेले असले तरी त्याच्या दसपट राज्य थोडक्याच वेळांत पुन्हां जिंकण्याची या म्हाताऱ्याच्या अंगांत अजून धमक आहे; पण त्या माधव राजाखेरीज सर्व व्यर्थ हो व्यथे ! हे पाप्या, चांडाळा, अंधमाधमा, मातारज्या, ज्या हातांनी 'माधव राज्यारोहणाचा ' समारंभ केला, त्या हातांनी 'माधव निधना' नंतरची तयारी करप्याला अद्याप जेव्हां कायम राहिले, तेव्हां ते गळून तुटून जळून का नाही गेले. ज्या डोळ्यांनी माधवराज्यारोहण' पाहिलं त्या डोळ्याला माधवनिधन ' पहाण्याची पाळी आली असतां, ते अद्याप फुटन कसे गेले नाहीत.