पान:माधवनिधन.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जानेवारी १९०० माधवनिधन. १२९ जी हाडे ‘माधवाच्या व मराठी राज्याच्या' रक्षणाकरितां आजपर्यंत झिजली, ती थेरड्या तुझी जीर्ण हाडे मोडून त्यांचे पीठ अद्याप कसे झाले नाही? हे निर्दया यमा, ज्याअर्थी तूं मराठीराज्याचा प्राण घेऊन गेलास, त्याअर्थी त्या बरोबर हे निर्जीव झालेलें शरीर लागलेच घेऊन जा. आता त्याचा काहीएक उपयोग नाही. नको, नको, ' माधवनिधन ' आणि त्याबरोबर मराठीराज्याचेही निधन ' पहाणे, ऐकणे आणि आतां जगणे, यापेक्षा हे डोळे फुटले, हे कान बहिरे झाले, आणि या देहांतील हाडें कोल्ह्याकुत्रयांच्या भक्ष्यस्थांनी पडली तर फार फार बरे होईल. हे काळा, या म्हाताऱ्या नानाचा हा आतां गुटमुळु लागलेला प्राण लवकर लवकर माधवाजवळ घेऊन जा. हे हिंस्त्र पशनों, या म्हाताऱ्याचं हे जीणे शरीर फाडून टाकून याला माधवनिधनामुळे होत असलेल्या यातनापासून सोडवा. ( अंगातील कपडे फाडूं लागतात ) हे अभाग्या नाना, तूं खरोखर अभागीरे अभागी, नशीब, नशीब, आमचं सर्वांचेच नशीब खडतर ! हाय हाय !! बाबूराव-खडतर, फारच खडतर, हो नाना! [दोघे दुःख करीत निघून जातात. ] 0000०००००००० अंक ५ समाप्त. SoSo80००००००००868398