पान:माधवनिधन.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२७ नानेवारी १९०० ]. माधवनिधन. नशीब, आमचं सर्वांचे नशीब मुळी खोटं त्याला दुसरा काय करणार ! हैं दुर्दैवा--( कपाळावर हात मारतो.) (इतक्यांत नाना फडणवीस घाईने येतात, बाबूराव त्यांस पाहून मोठ्याने ओरडून रुदन स्वराने) नाना, नाना, घातहो घात, त्या निर्दय कालानं सर्वस्वी घात केला. श्रीमंतांनी आमा सर्वाना मागे टाकून, अनाथ करून आपण एकट्यांनी कैलासवास केला. नाना--(दुःखाने ) हाय, हाय, काय हा अकल्पित घाला! [ मूच्छित पडतात. ] बाबूराव-श्रीमंत, मैत्रीची अखेर अशा रितीनं केलीत अं! बाजीरावाचं आपल्याला स्मरण झालं, त्यांची व्यवस्था आपण सांगितलीत, पण आमची व्यवस्था आपण कोणाला सांगितलीत? आमा सर्वांना कोणाच्या स्वाधीन केलंत? नाना--( अंमळ सावध होऊन दुःखाने ) हे अभाग्या थेरड्या, तूं अ. चाप जगलास कसा ! आणि आता तुझ्या जगण्याचा उपयोग तो काय ? जगून तूं आणखी काय करणार? मी आज असं करीन, उद्यां तसं करीन, असें नानात-हेचे मनांत बेत करणं किती मूर्खपणा आहे. नानात-हेचे खेळ खेळून जो अखेरी चांगली साधतो तोच खरा शहाणा, आणि तोच खरा भाग्यवान. नानासाहेबांच्या वंशवृक्षाच्या फांद्या दुर्दैवाच्या झंझावाताने एकामागून एक कडाकड मोडून तो वृक्षही मुळासकट उलथून पडला. सुदैवानं एका मुळाला पाणी घालून, कोंब आणून त्याचा पूर्वीप्रमाणे प्रचंड, घनदाट असा; सवे महाराष्ट्रीयांना त्याच्या सावलीत बसून विश्रांति आणि सुखोपभोग घेण्याकरिता, वक्ष बनविण्याची खटपट करीत होतो, पण ते आमच्या दुर्दैवाला सहन झालं नाही. दादासाहेब, हैदरनाईक, टिपूसुलतान, वस्ताद फिरंगी, कावेबान मोंगल वगैरे लोकांच्या खोडी मोडून, खड्याच्यावेळी सर्व महाराष्पवीराना एका छत्राखाली आणून महाराष्ट्रांतील एकीचा प्रभाव, व श्रीमंत का. पती आणि पेशवे यांचा दरारा दाखवून मराठ्यांचा ध्वज उभारला व सर्वाना स्वराज्याचे सुख लागावं ह्मणून पुष्कळ खटपटी केल्या, पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. आमच्या नशिबी दुःखच भोगायचं आहे. श्रीमंत सदाई माधवराव पेशव्याची अंमलदारी सौंपेक्षां सवाई करून दाखवीन अशी मला