पान:माधवनिधन.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माधवनिधन. अंक १ ला प्रवेश पहिला. स्थळ-शिवनेरी किल्लयांतील बाजीरावाचा दिवाणखाना. पात्रे-बाजीराव एकटा आपल्याशी विचार करीत बसला आहे. बाजीराव-( आपल्याशी ) अरेरे, काय ही आमची स्थिति ! ज्या भामच्या दादांनी एका भरारी बरोबर भीमथडीच्या घोड्यांना 'सिंधूनदीचं पाणी पाजलं; "पानपतच्या लढाईत जय मिळाला, मराठ्यांची चांगली खोड मोडली, शेकडों वीरांची कत्तल केली, लक्षावधी सैन्य मातीस मिळविलं;" ह्मणून विजयगर्वाने फुगून गेलेल्या गिलच्यांना अटकेपार घालवून दिलं, व आपणाला शौर्याच्या कामांत प्रती बाजीराव असे सर्वांकडून हाणवून, मराव्यांचा दरारा सर्व हिंदुस्थानभर थोडक्याच दिवसांत बसविला; त्याच रघुन नाथराव दादांचे पुत्र, मी बाजीराव व आप्पा, आज जन्मापासून आमच्या हाताखालच्या चाकराचे बंदीवान होऊन, तो घालील तो तुकडा खाऊन व देईल ते वस्त्र पांवरून या किल्लयांत आयुष्याचा एकेक दिवस मोजीत पडलों आहोत. अँ. जर लढाईत पाडाव होऊन आपल्या शत्रूचा बंदिवान होऊन, अशा रितीची कैद भोगण्याचं आमच्या नशिबी आलं असतं, तर आमाला त्याचं यत्किचित् सुद्धा दुःख वाटलं नसतं, ती तशी कैद आह्मी जन्मभरपयंत मोठ्या आनंदानं सोशिली असती; कारण तीत काही तरी पुरुषार्थ होता, व लोकांना आमच्या स्थितीबद्दल काही तरी करुणा आली असती; किंवा आपल्याला दैव प्रतिकक असल्यामुळे अशी स्थिती आली, असें समाधान