पान:माधवनिधन.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२६ ____ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ८ झालास ? मजसारख्या मतिमंदाचा या जगांत कांही उपयोग झाला नाही तरी यमाच्या घरी माझा काही उपयोग होईल खास ! निदान मी त्याच्या घरी गेलो तर माझ्या मनाला होणाऱ्या वेदना तरी तो खास कमी करील ! बलवंतराव, अहो बाई, काय तुझी माझ्या आधी त्या मृत्यूच्या घरी जाऊन स्वस्थ विश्रांति घेणार ? छे, ती गोष्ट कधी होणार नाही, मी ती तुह्याला कधीं ककरू देणार नाही. तुमाला माझा माधवराव पेशव्यांचा हुकूम ऐकलाच पाहिजे. चला फिरा मागे! काय तुझी मागं फिरत नाही? तसेंच तुझी पुढे चाललात! अशी वस्तादगिरी पेशव्याशी ! मी असा वस्ताद आणि आपस्वार्थी आहे की, त्यापुढे तुमची वस्तादगिरी कांहींच चालणार नाही. थांबा, थांबा, जर तुझी न थांबून माझ्या आधीं जाल. तर मी धांवत धांवत येऊन तुमच्यापुढे जाईन; पाहूं बरें आधी त्या विरामस्थानी कोण जाऊन पोहचतो. हा पहा तुमच्यापुढे, हा असा मी जाणार ! आतां बसा खुशाल रडत. (एकदम जाऊन उडी टाकतो; इतक्यांत मोरोपंत भावे व कोंडाजी ओरडत येतात.) दोघे-( मोठ्याने ) घात, घात, श्रीमंत पडले. धांवा, धावा. (दोघे जातात.) र प्रवेश १० वा. स्थळशनवारचा वाडा. पात्रे बाबराव फडके येतो. वाबूराव-(दुःखाने ) आजचा आह्मा महाराष्ट्रीयांना हा असा दुर्दिन उगवेल, असं कधीं स्वप्नांत सुद्धा आमच्या आलं नाही. आज सूर्यनारायणान आपल्या बरोबर आमचा महाराष्ट्राचा वैभवरवी अस्तास नेऊन आमा साना गाढ अंधारांत लोटून दिलं ! हे नारायणा, तुझी चार प्रहर रात्र सरल्यानंतर तूं उद्या सकाळी पुन्हां उदयाला येऊन सर्व जगाला अंधाऱ्या रात्रीमुळे झालेला ताप नाहीसा करून आनंदीत करशील, पण आमां महाराष्ट्रीयांचा वैभवरवी पुन्हां केव्हां उदयाला येऊन आमा सर्वांना आनंदीत करील ता करो ! सध्या मात्र आमच्या दुर्दैवाच्या गाढ अंधाया. रात्रीला आरंभ झाला.