पान:माधवनिधन.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२५ जानेवारी १९००] माधवनिधन... वनांत रक्षण केलं तसंच तो तुझंही करील. तूं दैवयोगानं जगून जर मोठा . झालास तर रानांत राहून फळावर आपलं पोट भर, अगर भीक मागून आपला जीव जतन कर, पण तूं आपल्या पोटाकरितां, पेशव्याचा इमानदार चाकर होऊन, तूं आपल्या वडिलाप्रमाणे मात्र इमानदारीनं चाकरी करूं न. कोस बरं ? नाहीतर तुझ्या वडिलाप्रमाणे तूंही राजद्रोही ठरून फुकट फुकटरे पेशव्यांच्या कैदखान्यांत पडून मरशील. ( रागाने ) ज्या माझ्या दुष्ट कपाळानं माझी चहूंकडे निराशा करून मला यमयातना इथेच भोगायला लाव. स्या, ते हे माझं कपाळ या ठिकाणी असे आपटून त्याच्या चिंधड्या करून टाकल्या ह्मणजे माझं दुःख संपलंच; पण श्रीमंत, आपल्या आणि त्या मागहृदयीं नानाच्या मनाचं एका गरीबाच्या कुटुंबाची वाताहात करून तरी समाधान होऊंद्या. ह्मणजे झालं! (डोके ताडताड भूमीवर आपटते आणि पडते.) .: माधव--( घाबरून आणि त्रासाने ) अरेरे, काय करूं! नाही हे माझ्यानं पहावत. यांच्या मस्तकाच्या घावाबरोबर वज्रघाताप्रमाणे माझ्या अंतःकरणावर घाव पडून त्याचे तुकडे तुकडे होत आहेत. त्यांच्या प्रत्येक शब्दानं, तापवून लाल लाल सांडशीनं माझ्या काळजाला चराचर चरके बसल्याप्रमाणे होऊन मला यमयातनापेक्षाही दुःसह यातना होत आहेत. त्यांचा दु:खितात स्वर, कडकडीत तापलेलं तेल कानांत ओतल्याप्रमाणे होऊन माझं सर्व डोकं भाजून टाकल्यासारखे करीत आहे. त्यांच्या क्रोधयुक्त दृष्टीने विस्तव लावून दिल्याप्रमाणे माझ्या अंगाचा भडका करून दिला आहे. इतका ताप मी कसा सहन करूं ! ( थांबून इकडे तिकडे फिरून ) हा ताप नाहींसा होण्याला त्यांनी सांगितलेल्या मृत्यूशिवाय आतां दुसरा उपायच राहिला नाहीं ! बाबासाहेब, आप्पासाहेब, यशोदे, बलवंतराव, तुमच्या सर्वांच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या दुःखाला हा अभागी माधव सर्व प्रकारानं कारण झाला. ज्याला स्वताला काही करता येत नाही, ज्याचा स्वताचा स्वताला कांही उपयोग नाही, सर्व गोष्टीत दुसन्याच्या तंत्राने पशुप्रमाणे चालणारा, स्वार्थ आणि परमार्थ काहीएक न साधणारा आणि उलट आपल्या आप्तस्वकीयांच्या दुःखाचं मूळ होऊन बसणारा; असा अजागळा माधवा, तूं कसा