पान:माधवनिधन.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ८ आपले आप्त समजून त्यांच्याशी आप्तपणा जोडण्याची खटपट केली, ह्मणून त्यांना पूर्वीपेक्षा जास्त बंदीवास झाला, व दुःख सोसावं लागलं. श्रीमंतांनी आपल्या आप्ताचं, आपल्या मित्राचं, जो इमानदार चाकर आपल्याकरिता मनोभावानं झटला त्या चाकराचं, व त्याच्या गरीब कुटुंबाचं हाती सत्ता असून दुःख कमी केलं नाही व त्याची दाद घेतली नाहीं; त्यामुळे श्रीमंतांची आपल्या आप्ताबद्दलची आस्था, आपल्या मित्राबद्दलची कळकळ, माया, दया, न्यायीपणा वगैरे सर्व श्रीमंतांचे अमोल्य गुण आतां सगळ्या जगाला दिसले. श्रीमंताच्या कामगिरीत जर पागेदार आणि बाजीरावसाहेब न पडते तर आझी सर्वजण आपापल्याजागी मोठे सुखी असतो. पण श्रीमंतांकरितां आझी सर्वजण दुःखांत पडलों. श्रीमंताची कामगिरी हे सर्व दुःखाचं मूळ आहे. अंगी सामर्थ्य असून ज्याच्या हातून आपल्या आप्ताचं बरं होत नाही, त्यांचं संकट व दुःख दूर होत नाही; गरीबावर, निदान आपल्या कामाकरितां दुसऱ्याकडून जुलूम झाला असतां ज्याच्या हातून त्याची दाद बेतली जात नाही, उलट त्यांच्या दुःखाला मात्र जो मूळ होतो,तो असा आप्त, असा मालक, आणि असा राना तरी होतो कशाला ? बाजीरावाचा बंदीवास, पागेदाराच्या कैदेतील हाल अपेष्टा, आणि निराशा झाल्यामुळे माझ्या मनाला होणाऱ्या दुःसह यातना; श्रीमंतांनी आमची दाद न घेतल्यामुळे जरी अगदी कळसास जाऊन पोहचल्या आहेत, तरी त्यांचं मृत्यूपुढे काही चालणार नाही. या जगांतील संकटांनी मनाला झालेला त्रास घालविण्याला मृत्य शिवाय दुसरा उपाय नाही. पागेदार थोडक्याच दिवसाचे सोबती असल्यामुळे त्यांचा कैदेतील त्रास लवकरच नाहीसा होईल; पुण्याला पावन करणाऱ्या नदी देवीनं मला आपल्या पोटांत घेतलं ह्मणजे माझ्याही यातना संपतील; पण श्रीमंताच्या न्यायीपणाचा, ममताकुपणाचा आणि थोरपणाचा, पागेदाराच्या कुटुंबाच्या नाशामुळे वाजलेला डंका मात्र सर्व काळ सारखा वाजत राहील. ( मुलाकडे पाहून ) बाळा, माझ्याकडे आतां कशाला पहा. तोस ? तुझा माझा संबंध आतां फार थोडा आहे. आमच्या मागं तूं पोरका होशील; त्या तुझ्या पोरक्याचं शकुंत पक्षाकडून, देवानं जसं शकुंतलेच राना