पान:माधवनिधन.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जानेवारी १९००] माधवनिधन. १२३ समजण्याकरितां पागेदाराच्या हातापायांत वजनदार बिड्या ठोकून पिंजऱ्यांत त्यांच्या समोर ठेवून एकमेकांच्या दुःखावर डाग देणारे कसाईपेक्षां कसाई आणि निर्दय एक नानाच ! आणि त्यांचं करणं ते योग्य आहे, असं समजून आपल्या कामाकरितां दुसरा बळी पडला असता त्याची काही तजवीज न करणारे असें मायाळू व थोर प्रभू एक श्रीमंत पंतप्रधान पेशवे सरकारच ! पागेदार जात्या अशक्त, त्यांत त्या वजनदार बिड्यांचं ओझं, ती कैदेतील हाल अपेष्टा त्यांच्यानं सहन होईनात, एवढी निकराची वेळ आली ह्मणून मी निर्भीड होऊन सरकाराजवळ दाद मागण्यास आले, तो मला पेशव्यांच्या न्यायी दरबारी, आणि श्रीमंताजवळ मज्जाव. माझ्या सौभाग्याकरितां मी निर्भीडतेनं वाटेल ते करीन, वाटेल तेथे जाईन, कधीही भिणार नाही. माझ्या सौभाग्य दागिन्याकरितां माझी धनदौलत, माझं पोटचं मूल, माझे प्राण वाटेल त्या क्षणी मी देण्यास आणि त्याचं रक्षण करण्यास तयार आहे. पेशव्यांच्या दरबारी, खुद्द पेशव्याजवळ, आणि जगांत कुठेही जर माझी दाद लागत नाही तर ज्या प्रभूजवळ नानासारख्या निदेय मांगाची, पेशव्यांच्या दरबारची, खुद्द पेशव्यांची आणि माझी एकेच वेळी दाद लागेल आणि सर्वांचा सारखा न्याय होईल त्याच ठिकाणी मी आतां जाईन, आणि देवापाशी दाद मागेन. त्याच्या दरबारी तर मला मज्जाव होणार नाहीं! प्रत्येक ठिकाणी निराशा झाल्यावर मग तसं केल्याशिवाय गत्यंतरच नाही. चहकडे माझी निराशा व्हावी, अशी मी फुटक्या नशिबाची कशी झाले ? बाळा, तूं देखील आमच्याच सारखा दुर्दैवी झालासना! आमी उत्तम कामगिरी के. ल्याबद्दल आमाला देहान्त शासन, हा पेशवाईतला न्याय सर्व लोकांनों ध्यानांत ठेवा बरें! माधव-( आपल्याशी) तुझ्यापेक्षा हा पोरका माधव किती दुर्दैवी आहे. हे बाई तुला कशाने समजणार ? सत्यभामा-श्रीमंत सरकार, पागेदारांनी आपली कामगीरी आपल्या मजर्जीप्रमाणे केली ह्मणून ते कैदेत पडले. ते कैदेत पडले ह्मणून त्यांची ही दोन माणसें दाही दिशेला लागली. श्रीमंत बाजीरावसाहेब यांनी श्रीमंत