पान:माधवनिधन.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ८ लेली गोष्ट सरकारास पसंत पडली असं वाटतं. माझ्या गरीब बापडीच्या विनंतीकडे सरकारचं लक्ष कां जात नाही ? कोणी माझं ह्मणणं ऐकेना, कोणी माझी दाद घेईना, कोणी माझा न्याय करीना, ह्मणून निर्भीड होऊन मी सरकाराजवळ दाद मागण्यास आले; पण त्याही ठिकाणी माझी निराशा झाली. माझ्या येथील प्रयत्नाची आतां इथंच आखेरी झाली. सरकार बोला, माझ्या विनंतीला मान द्या, पागेदारांना आपल्या कामगिरीबद्दल झालेली शिक्षा अगदी योग्य झालीना? तो अगदी न्याय झालाना ? आपल्या मोठ्यांच्या मुक्याच्या व्रतानं आमची गरीबाची कोण दुर्दशा, कोण दैना होत आहे आणि आमचे प्राण कसे कासाविस होत आहेत, हे सरकार आपल्याला कशाने कळणार ? माधव-( तोंड वळवून आपल्याशी) बाई, माझे देखील प्राण कसे खालवर होत आहेत हे तुला तरी कसे कळणार ! हिची स्थिती माझ्याने पहावत नाही, व हिचे शब्द आता माझ्या कानांनी मला ऐकवत नाहीत! ( उघड ) अरे सत्यभामा-(त्रासून आणि निराशेनें ) आपल्या पतीनं मारलं, पावसानं झोडपलं, राजानं लुटलं तर ते कोणाजवळ सांगायचं, आणि त्याचं निवारण तरी कोण करणार ? सरकारनी माझ्याकडे पाठ फिरविल्यावर माझी आतां दाद कोण घेणार ! सरकार, पागेदारांनी आपले निरोप बाजीरावास व बाजीरावांचे सरकारास, पोहचविले हा त्यांनी राजद्रोहाचा गुन्हा केला असें सरकारास वाटतं, की सरकार नानांस मितात ? काय होतं ते एकदां स्पष्ट कळलं पाहिजे. एकमेकांचं सख्य करून दिल्याबद्दल कुठं अपराध होत नाही, पण पेशवाईत आणि नानांच्या घरी मात्र तो गुन्हा होतो, व तो गुन्हा करणाऱ्यास जन्मभर कैदेची शिक्षा मिळते. हे, सर्व स्त्रियानों, तुझी चांगलं लक्षात ठेवा आणि आपापल्या पतीस असा गुन्हा त्यांच्या हातून न होईल असा उपदेश करा; नाहीतर, साध्वी स्त्रियांनो, तुमची स्थिती माझ्यासारखीच होईल. बाजीरावसाहेबाना आपला बेत कसा फसला ह्मणून, आणि आपण या कामांत पडलों ह्मणून आपली ही अशी दशा झाली, अस