पान:माधवनिधन.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२१ नानेवारी १९००] माधवनिधन. प्रवेश ९ वा. स्थळ-गणपतीचा दिवाणखाना. पात्रे श्रीमंत माधवराव पेशवे माडीवर कठड्याला टेकून बाहेर पहात उभे आहेत, जवळ सत्यभामा मुलाला घेऊन हात जो डून विनंति करीत आहे. सत्यभामा-एवढा वेळ मी सरकारची विनवणी केली, पण सरकारकडून कांहींच जाब येत नाही, त्यावरून याही ठिकाणी माझ्या अमागिणीच्या कमनशिबानं आपला प्रभाव दाखविला ह्मणायचा! सरकारच्या दयाळूपणाबद्दल आणि न्यायीपणाबद्दल पुण्यातील सर्व लोकांची घाशीरामाला सरकारांनी दिलेल्या शिक्षेमुळे खात्री झाली आहे. असं असून माझ्यासारख्या दीन बापडीला तो अनुभव जेव्हां येत नाही, तेव्हां माझंच नशीब फुटलं याशिवाय दुसरं काय ? सरकार, आमच्या तीन माणसांच्या गरीब कुटुंबावर, सरकारची कामगिरी इमानदारीने केल्याबद्दल आग, आग, नानांनी आग पाखडली आहे. सरकारचं आणि त्यांच्या आप्ताचं सख्य करून दिल्याबद्दल, नानांनी निर्दयपणानं आमची तिघांची ताटातुट केली. दोन निरनिराळी असलेली कु. बं एक करण्याची पागेदारांनी खटपट केली ह्मणून नानांनी आमच्या कुटंबाचा सत्यानास केला. आप्ताआप्तांचं कुशल वर्तमान एकमेकांना कळवन त्यांचे निरोप आणि भेटी परस्परांस सांगून दिल्याबद्दल त्यांच्या पायांत जड बिड्या घालून नानांनी कैदेत टाकलं, आणि प्राणांतापर्यंत वेळ आणली, तरी देखील त्यांची इच्छा तृप्त झाली नाही व त्यांचं मन व राग शांत झाला नाही. आमा तिघांना एके जागी उभं जाळून टाकल्यावर मग नानांचं मन शांत झालं तर कोण जाणे! हे सवे सरकारच्या कामाबद्दल पागेदाराना आणि त्यांच्या कुटुंबाला बक्षिस मिळालं बरं! माधव-(आपल्याशी) ह्या बाईचा प्रत्येक शब्द माझ्या काळजाला घरे पाडीत आहेत्यामुळे मला अत्यंत वेदना होत आहेत, पण काय करूं? सत्यमामा--सरकार ज्याअर्थी बोलत नाहीत; त्याअर्थी नानांनी के