पान:माधवनिधन.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. - यशोदा-मैना ही कोण ग बाई ! ही काय हें बडबडते. 12 मैना-बाईसाहेब ही कोणी तरी वेडी बाई आहे. ही इथं आली कशी ! (तिच्याकडे वळून ) ए वेडे, तूं दरबारांत जाऊन नानासाहेबापाशी फिर्याद कर ! ते तुझी दाद घेतील. जा येथून. तुझं काम इथून व्हायचं नाही. -सत्यभामा-( त्रासून ) कोणापाशी, त्या मांगापाशी, त्या काळापाशी त्याच्याचबद्दल फिर्याद नेऊं. अहो त्यानंच तर सर्व अनर्थ केला आहे. त्यानंच आमच्या सर्व घराला आग लावून आमाला भाजून टाकलं आहे. तुझीच माझं ऐका. मी तुमच्या पाया पडते हो! (तिचे पाय घट्ट धरते, मैना जोराने त्यांचे पाय सोडविते ) तुझी माझं ऐकत नाही तर मी येथून हालणार नाही. मैना-बाईसाहेब चला येथून ! ही वेडी तुह्माला त्रास देईल. मी खाली जाऊन शिपायाकडून हिला बाहेर घालवून लावते. (दोघी जातात.) सत्यभामा-बाईसाहेब, ऐकाहो ऐका, माझी गरीब बापडीची एक फियाद ऐका! दोघीजणी आपण एकच आहोत ! [धांवत मागे जाते, तो मैना तिला ढकलून देते. ] [ त्रासून ] ही मोठ्या लोकाजवळची कुत्री अशीच में ली द्वाड असतात. यांचा काहीएक चांगला उपयोग नसून ही नुसती अंगावर येण्याच्या व भोंकण्याच्या मात्र उपयोगाची! हा मेल्या निदेया दुर्देवा इथंही तूं आपला थोडासा प्रभाव दाखविलासना! बरं इथं माझी दाद लागली नाही तर श्रीमंत पंतप्रधानाजवळ जाऊन मी दाद मागेन! [ वर पाहून ] अहाहा, किती आनंद! केवढा सुदीन. ती पहा स्वारी तेथे माडीवर उभी आहे. थांब मेल्या, तिथं जाऊन फिर्याद करते आणि मांगा तुझी चांगली खोड मोडते. [ जाते. ]