पान:माधवनिधन.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जानेवारी १९००] माधवनिधन. माझ्याकरितां त्यांना दोन गोष्टी सांगा बर कां! सांगाल कां ? तुमच्या तोंडावरून तर तुझी चांगल्या ममताळू आहांत असं दिसतं. हे माझं वाटणं तुझी आपल्या कृतीनं खरं करून दाखवा, नाहीतर सगळंच उलट करून मला फसवाल. तुझी माझं एवढं काम केलंत झणजे मी तुझाला हा माझा सोन्याचा तुकडा देईन बरं. नाही, नाहींग बाई मी आपला हा सोन्याचा तुकडा तुह्माला द्यायची. हा तुमच्या दृष्टीस पडला ह्मणजे मग तुझाला हा घेण्याची इच्छा होईल. तेव्हां तुमच्या हा दृष्टीस पडूं नये ह्मणून मी याला अगदी लपवून ठेवीन. मी माझ्या हृदयांत याला ठेवीन. ( मुलाला पदराखाली लपविते ) यांबद्दल मी तुझाला माझे पाहिने तर प्राण मोठ्या मोठ्या आनंदाने देईन बरं का! त्याला नाही मी कधीं मागं सरायची! कुठं कुठं आहेत राणीसाहेब, मला लवकर दाखवा. कां. नाही दाखवीत. ठिकाण दाखबायला देखील तुमच्या पदरचं काही वेचतं. तुझी दाखवीत नसाल तर मी इथूनच त्यांना ऐकू जाईल असं ओरडते. ( मोठ्याने ) अन्याय, जुलूम, बाईसाहेब, जुलूम हो जुलूम. माझी दाद ध्याहो. मैना-अग ए वेडे, या बाईसाहेब इथंच आहेत. तुला दिसत नाहीं कां! उगीच ओरडतेस कां राक्षसणीसारखी. सत्यभामा-होय कां! ह्या कां त्या ! ( त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या पायावर डोके ठेवते ) बाईसाहेब आपल्या येथील एका मोठ्या निर्दय मांगानं आमच्या गरीब कुटुंबावर आग पाखडली आहे हो ! त्यांन आह्मी अगदी होरपळन गेलो आहोत, आमचा कोणी वाली नाही, आमची कोणी दाद घेत नाही. आमची कोणाला दया येत नाहींहो. बाईसाहेब करतां कां कृपा! आपल्या पतीच्या जिवाला कांहीं बरं वाईट झालं, त्यांच्या पंचप्राणांची ती आपली ठेव कोणी निर्दय राक्षस जर हरण करून घेऊन जाऊ लागला तर त्याबद्दलचे दुःख बायकांना किती होतं, हे बायकाशिवाय दुसऱ्या कोणाला तरी चांगलं कळेल का ? ह्मणून मी आपल्याकडे आले आहे हो! तो मेला पेशव्यांच्या दरबारांतला. मोठा राक्षस फार माजला आहे. त्याला चांगली शिक्षा करा.