पान:माधवनिधन.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ८ उडी टाकायला जाणं, आणि काल संध्याकाळी त्या शिकारखान्यांत जाऊन त्या शंभू वाघापुढे उभं राहणं; वगैरे गोष्टी ऐकून माझं काळीज किनई चरे होऊन गेलं आहे. आह्मां मुलींना सर्व गोष्टीची चोरी असल्यामुळे आमाला तुमच्या सारख्याच्या मार्फतच या सर्व गोष्टी करून घ्याव्या लागतात. मैना, जा, जा, आणि आतां प्रकृती कशी आहे याचा शोध करून ये. तुझ्याशिवाय ही माझ्या मनांतील गोष्ट मी दुसऱ्या कोणाजवळ सांगू? दुसऱ्या को णाजवळ ही बोलेन तर तर सर्वजण माझी थट्टा करतील. पण गडे मनांत काय होत आहे तें किनई सागतां येत नाहीं ग! तूं आपल्या मनांत मला आतां वाटेल तें ह्मण. पण मी तुझ्याजवळ आज माझा नाईलाज झाल्यामुळे थोडीशी निर्भीड झाले खरी. बाई-काय-करूं-ग एकेक भयंकर प्रकार रोजचे ऐकते त्यामुळे राहावत नाहीं ग! ( डोळे पुसते.) मैना-बाईसाहेब इतकी काही काळजी करायला नको. स्वस्थ असा, मी आतां जाऊन शोध करून येते. - यशोदा-अग काळजी करायला नको आणि हवी, या गोष्टी कोणी 'सांगून कां करतं ! जा, गडे जातेसना ! मैना-अहो जातें ! जाते पण इतक्या उतावीळ का होता ? (हांसते.) यशोदा-जा, जा लवकर, मग पाहिने तर कर थट्टा! मैना-(जाऊं लागते. इतक्यांत केस पिंजारलेली, कावरीबावरी मुद्रा झाली आहे अशी कडेवर मूल घेतलेली सत्यभामा येते) ही वेडी पिशी बाई कोण ! आणि ही इथं कशाला आली. सत्यभामा-( केविलवाण्या मुद्रेनें ) अहो बाई, राणीसाहेब कोणच्या. त्या कुठं आहेत, त्या मला दाखविता काय ? त्या जिथं असतील त्या ०", णचा मला रस्ता दाखवितां कां ? मी किनई गांजलेली, त्रासलेला, कहावलेली, त्या मेल्या चांडाळ कुटिल, निर्दय कारभाऱ्यान, , मुळे संतापलेली, आणि कोणी माझी दाद घेत नाही, ह्मणून व गलली, अशी मी एक गरीब बिचारी आहे बरं ! मला त्या च्याकडे फिर्याद करायची आहे. त्या माझी दाद खास ' ह्मणून वैतागून बहकून मला त्या मांगाविरुद्ध त्याद खास घेतील. अहो तुझा