पान:माधवनिधन.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जानेवारी १९००] माधवनिधन. ११७ कृती बिघडली आहे, तेव्हां श्रीमंतांवर सक्त देखरेख ठेवावी, असा आमाला हुकूम आहे. माधव-तर मग तुह्मी माझ्यावर पाळत राखणारे गुप्त हेर आहांत अंः ! अरे काफरानों आतां हेराची सोंग आणलीत काय ? हिंडण्या फिरण्यांत; बसण्यांत उठण्यांत, जेवणाखाण्यांत, प्रत्येक गोष्टीत माझ्यावर देखरेख ठेवण्याबद्दल तुमाला नानांचा हुकूम आहे ! ज्या गोष्टी लहान मुलाला सुद्धा सहज करतां येतात, त्या मला बरोबर करता येत नाहीत इतका मी अजागळ, बैल आहे, असं तुमाला वाटून तुह्मी मला त्यांच्या हुकूमानं प्रत्येक गोष्टीत प्रतिबंध करता! जसा तुझी मला समजता तसा मी नाही; समजलांत. चला चालते व्हा येथून. निघा, निघा. नाहीतर-( दांत ओंठ चावतो.) मोरो०-सरकारांनी आमचे प्राण घेतले तरी आमी सरकाची पाठ सोडणार नाही आणि हुकूमाबाहेर चालणार नाही. आमी ताबेदार आहोत. माधव-(त्रासून ) माझं मन, माझं शरीर, माझे हातपाय याची काळजी दुसऱ्यानं घ्यायची, मी दुसऱ्याच्या संमतीनं कोणतीही गोष्ट करायची, प्रत्येक वेळेला मला दुसऱ्याचा हुकूम पाहिजे अंः ! हे देखील तुझं तुला संभाळता येऊ नये, इतका बैला, अजागळा, तूं कसा झालास ! तूं अजागळ आहेस ह्मणून तुझी अशी दशा! त्यापेक्षा असा एखादा जंगलातला हिंस्त्र पश झाला असतास तर फार चांगलं झालं असतं, ह्मणजे तुला ही तमासगीर मंडळी काही तरी भ्यायली असती. तूं खरोखर बैल आहेस, मणनच तझी वेसण जिकडे ओढली जाईल तिकडे तुला गेले पाहिजे. चला, बैलोबा चला. mai ( सर्व जातात.) प्रवेश८वा. स्थळ-यशोदाबाईचा महाल. पात्रे-यशोदाबाई आणि मैना. यशोदा--गडे मैना, तिकडच्या प्रकृतीचं मान मला घटकोघटकी कळवीत जा. मी त्याबद्दल तुझी मोठी उतराई होईन. दसऱ्याच्या दिवशी अंबारीतन