पान:माधवनिधन.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११६ . कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ८ प्रतिबंदाचं दुःख होत नसेल कां! पण आपल्या फायद्यापुढे दुसऱ्याच्या दु:खाचा विचार कोण करतो ! असला नीचपणा मनुष्यांतच भरला आहे. ( पुढे वाघाजवळ जातो) खायला, प्यायला, वगैरे सर्व गोष्टी मनुष्याला काय, अगर पशूला काय, यथास्थित असोत, अगर नसोत; कोणालाही स्वातंत्र्यासारखी मजा नाहीं,. आनंद नाही आणि बलही नाही. पारतंत्रचासारखं दुःख नाही, आणि पारतंत्रयासारखा मोठ्या बलवानाला आणि मोठ्या शहाण्याला बलहीन करणारा आणि मतिमंद करणारा. दुसरा रोगही नाही. हे मृगराज, जेव्हां अरण्यांत स्वतंत्रतेनं विहार करीत होते, तेव्हां यांचं बल केवढं होतं; एका गर्जनेबरोबर सर्व रान गजबजून टाकून शेकडो जणांना थरथर कांपवून सोडीत होते, पण तेच हे मृगराज, पारतंत्रयाच्या साखळदंडांनी दोहोबाजूंनी जखडून टाकल्यामुळे कसे अगदी दीन गाय होऊन गेले आहेत. पारतत्रयंबंधानं मोठमोठ्याचीही अशी दीन अवस्था होते. पहा बिचारे कसे आपल्या दुःस्थितीबद्दल दुःख करीत आहेत. पण, अहो राजश्री आपल्याला देखील आह्मी जोडीदार आहोत. बाबासाहेबांनी एका पत्रांत लिहिल्याप्रमाणे त्यांची शिवनेरीस, माझी पुण्यास आणि या पशुपक्ष्यांची या शिकारखान्यांत सर्वांची स्थिती सारखीच आहे. फक्त स्थळाचं मात्र अंतर! मृगराजा, तुला तर दोनच बंदांनी बांधलं आहे, पण मला आंतून आणि बाहेरून शेकडा बंदांनी जागजागी अगदी जखडून टाकलं आहे. तुला पहाण्याकरिता जस शेकडो जण येतात, तसं आमचंही प्रदर्शन होत आहे. ही माझी बंधन मी आधीं फेंकून मोकळा होतो आणि मग तुलाही मोकळा करतो.. ( अंगावरचे दागिने, कंठी, कडी काढून फेंकून देतों, व वाघाजवळ जातो.) ( इतक्यांत मोरोपंत, कोंडाजी वगैरे जवळ जाऊन त्यांस मागे ओढतात.) मोरो०-(वावरून ) श्रीमंत, सरकार हे काय ! मागे सरावें तो पंजा मारील. माधव-(संतापाने ) काय, मला पेशव्याला जिथे तिथे तुमचा प्रतिबंध । तुह्मी इथे कशाला आणि कोणाच्या हुकमानं आलांत ? मारो० --श्रीमंताच्या रक्षणाकरितां, नानाच्या हुकुमान ! श्रीमंताचा