पान:माधवनिधन.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जानेवारी १९००] माधवनिधन. सावं ! झाडावरच्या पक्षापेक्षा हे आमच्या शिकारखान्यांतील पक्षी किती तरी सुखी, किती तरी आनंदी असले पाहिजेत. त्यांचा खाण्याचा, पिण्याचा, राहण्याचा किती छान बंदोबस्त आहे, असं असून मग यांचा करुणस्वर का? ( विचार केल्यासारखं करून) बरोबर आहे, याचं कारण आतां माझ्या लक्षात आलं बरं! हा प्रतिबंध. प्रतिबंध बरं यांच्या करुण खराचं आणि सर्व दुःखाचं कारण ! जरी त्यांची येथे अगदी उत्तम प्रकारची बरदास्त आहे तरी त्यांना स्वतंत्रता नसल्याने आपल्या मनाप्रमाणे नाचतां बागडतां, उडता, फिरतां येत नाही ह्मणून त्यांना हे सर्व सुख व्यर्थ वाटत आहे, हे त्यांचे जातबंधू त्यांना आपली स्थिती आपल्या शब्दानं दाखवून लाजवीत आहेत. आणि हे करुणस्वरानं मला आळवीत आहेत. ईश्वरानं ज्याला जी दे. णगी जन्मतः दिली आहे, ती दुसऱ्यानं त्याच्यापासून हिरावून घेण्याचा त्याला काय अधिकार आहे. त्यांतून स्वतंत्रतेसारखी ईश्वरदत्त देणगी हिसकावून घेणं किती भयंकर कृत्य आहे. पण आमी मनुष्यं हे भयंकर कृत्य करतो; आणि ते कशाकरितां, तर आमच्या स्वार्थाकरितां ! अं! एकाच्या अमोल्य देणगीवर आपल्या सुखाकरितां, आपल्या स्तााकरितां, मनुष्यानं अशा रीतीनं दरोडा घालून ती हरण करणं ह्मणजे यासारखा मनुष्याचा अप्पलपोट्या, स्वार्थी आणि नीच स्वभाव दुस-या कोणाचा नाही. जिथं तिथं स्वार्थाचं प्राबल्य आणि तेवढ्याकरितां आमी दुसऱ्याचं वाटेल तें नुकसान करायला तयार ! या नीचपणाला तर सीमाच नाहीं! माझ्या मनरंजनाकरितां हे सर्व बंदिवासांत आहेत अंः ! असला नीचपणा मी कधी करणार नाही. (जाऊन पिंजऱ्याचे दरवाजे उघडतो) जा तुह्माला वाटेल तिकडे जा, आणि स्वच्छंदाने हवे तिकडे उडा. फिरा. .. मोरोपंत-रोजची काही तरी विचित्र कृती ! कोंडाजी, श्रीमंताची स्वारी पुढे गेली ह्मणजे त्या रखवालदारास हळूच सांगून पुन्हा ती दार बंद कर बरं ! नाना रागावतील. कोंडाजी-जी व्हय! माधव-( त्यांना हुसकावून लावतो ) मनुप्याप्रमाणे त्यांना त्यांच्या