पान:माधवनिधन.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ८ न्याय, अन्याय, अरे मांगा-राक्षसा-तुझी देखील शंभर वर्षे आज नाही उद्यां केव्हां तरी भरतीलच भरतील. नको, मेल्याचं तोंड पहाणं नको. (निघून जाते.) सर्व जातात. प्रवेश सातवा. स्थळ-पर्वतीवरचा शिकारखाना. एकीकडे शंभू नांवाचा वाघ बांधला आहे. चित्ते बांधले आहेत, ससे, हरिणे, मोर नाचत बागडत आहेत. मैना, पोपट पिंज-यांत बोलत आहेत. पात्रे-श्रीमंत सवाईमाधवराव शिकारखाना पहात पहात येत आहे त, बरोबर मोरोपंत भावे, कोंडाजी, दाजीबा वगैरे. मंडळी नामागून चालत आहेत. THE माधव-(पक्ष्याकडे पहात. पहात ) अरे वारे वा! मी आल्याबरोबर हे सर्व पक्षी पहा कसे किलबिल किलबिल करूं लागले. ( त्यांच्या जवळ जाऊन ) हे मैने, ए गंगारामा, ए चंडोला, अरे बोला, आणखी बोला. तुमया किलबिलण्यानं मला फार आनंद होतो. तुमच्या सुस्वर आवाजानं माझे कान आणि डोकं अगदी भरून जाऊद्या; ह्मणजे मला दुसऱ्या कोणत्याही विचाराच्या भणभणण्यानं त्रास होणार नाही. हः, चालूद्या. चालूंद्या ! माझ्या जवळ येण्यानं जर तुमाला भीति वाटत असेल तर मी आपला लांब रहातो. वा मोरोपंत, तुह्मी तर आपल्या प्रियकरणीबरोबर खूपच लाडीगोडी लावू लागलात. पण तुमची कुठं तिच्याजवळ पत आहे. ती पहा कशी ऐटीनं तुमाला टाकून निघून गेली. आतां बसा स्वस्थ. बरं, तुह्मी आपल्या शब्दानं एकदा ह स्थान गर्जुन टाका पाहूं. (थांबून) नाही तुमची मर्जी. बरं आहे, आपल्याच मर्जीप्रमाणे होऊ द्या. तुह्मी आमच्यावर रुसलांत ह्मणून काय झालं, त्याप्रमाण ही दुसरी मंडळी कांही आमच्यावर खास रुसणार नाही. पहा त्यांनी कस आमच्या मनांतलं ताडलं? या पिंजऱ्यांतील पक्षांच्या शब्दांत (नीट ऐकल्यासारखे करून) बराच करुणस्वर ऐकू येतो, तसा काही त्या पलिकडच्या झाडावर बसलेल्या पक्ष्यांच्या शब्दांत येत नाही. याचं कारण काय बर *