पान:माधवनिधन.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जानेवारी १९००] माधवनिधन. ११३ मंताजवळ दाद मागायची आहे! एका मोठ्या निर्दय चांडाळावर मला फि- . र्याद करायची आहे ! चल जाऊं दे.. शिपाई-चलहो मागें ! जा नानासाहेबाकडे.. सत्यभामा-(त्रासिकपणाने ) कोणाकडेरे बाबा मला जायला सांगतोस, त्या मेल्या चांडाळाकडे ! तो मेला इथंही आहे का ? शिपाई-ये, उद्यां विद्या ! चल निघ. सत्यभामा--तो आमचा मागल्या जन्मींचा वैरी इथं असला तर मग माझी कपाळकरंटीची दाद कशाची लागते. तो मेला मांग जर इथं असला तर मला देखील मग इथं उभं राहयचं नाही, आणि त्या दुष्टाचं तोंडही पाहावयाचं नाही. ही मी निघाले पहा. तो नसेल अशाच वेळेला आणि अशाच ठिकाणी दाद मागेन. तो मेला काळ इथं असेल ह्मणूनच हे त्या काळाचे दूत मला आडवितात. नाहीतर मला आडविण्याचं या मुदाडांचं काय तोंड लागलं होतं ! अहो श्रीमंत, अहो जनहो, ब्राह्मणांना आणि गरीबांना छळणारा, त्यांचा घात करणारा, त्यांची दुर्दशा करणारा जो घाशीराम कोतवाल राक्षस, त्याला तुझीं दगडांनी ठेचून ठेचून ठार मारलात ह्मणून तुमचं दुःख कमी झालं असं मुळीं समजू नका बरं ! कारण हा मेला त्या राक्षसाचा पाठीराखा रक्तबीज राक्षस जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत तुमचं दुःख पहिल्यासारखंच आहे, अथवा त्याला जास्त भरती आली आहे असे समजा! हा आपल्या सामर्थ्यानं आणखी तसे शेकडो घाशीराम राक्षस उत्पन्न करील. याचं रक्त जेव्हां कोणी शोषील आणि याचं सामर्थ्य कोणी हिसकावून घेईल तेव्हां तुह्माला सुख लागेल. हे, हे सर्व लोकहो पक्कं लक्षात ठेवा. नाहीतर आमचं गरीब कुटुंब जसं देशोधडीस लागलं आहे, तशी तुमची शेकडों गरीब कुटुं। मातीस मिळतील बरें ! कोणी तुमची दाद घेणार नाही. अहो गरीब बापज्यानों, तरी याच्या गोड गोड बोलण्याला, मोठमोठ्या वचनांना भलन फर्म नका. याच्या झपाट्यांत येऊ नका. याच्यावर विश्वास ठेवून याला दे. वाप्रमाणे भजं नका, अहो याच्या दृष्टीस देखील पडूं नका; पडलात की फसलात, आणि फसलात की मनप्रमाणे सर्वस्वी बुडालात असे समजा. अ. २२