पान:माधवनिधन.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१२ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ सगळं जग तुला हांसत आहे, तुला त्याची काही लाज वाटूं दे. ( तोंड फिरवून बसतो ) बाबासाहेबांना आणि आप्पासाहेबांना बरोबर घेतल्याशिवाय मी या गादीवर आणि या दरबारांत कधीच बसणार नाही. अहो महाराज, अजून मी इतका अप्पलपोट्या झालो नाही बरं! मला काही तरी शरम आहे. ( मध्येच गादीवरून उठतो.) नाना—(पुढे होऊन हात जोडून ) श्रीमंत-हैंमाधव-( रागाने त्यांच्याकडे टवकारून पहातो; आपल्याशी) काय, वृद्ध आजोबा, गारुडीबोवा, याहूनही आमाला बेशरम बनवून सर्व जगाला आणखी आमचा तमाशा दाखविण्याचा आपला बेत आहे वाटतं! झालं हैं कमी झालं होय ! अजून काही आपली हौस पुरवून घेण्याची बाकी राहिली आहे वाटतं! अरे थेरड्या, गारुड्या, तूं सापाला त्याचे दांत पाडून जरी निर्जीव आणि निर्बल करून पेटाऱ्यांत घालून अगदी बंदीवान केला आहेस, तरी तो नुसत्या आपल्या फुत्काराने देखील तुझ्या जीर्ण देहाला कांपवून सोडील. चल मागें हो, खबरदार पुढे आलास तर. निघा-( रागाने दरबा- . रांतून निघून जातो.) नाना- (आश्चर्यचकित होऊन ) नशिब. आहे तीच स्थिती अद्याप कायम आहे. बाबूराव, दाजीबा, मोरोपंत जा, जा, त्यांच्या मागे असा. ( जाऊ लागतात.) ( इतक्यांत सत्यभामा केस विसकटले आहेत पायांत लुगड्याचा घोळ लोळत आहे तिची कावरीबावरी मुद्रा झाली आहे अशी येते.) सत्यभामा—( मोठ्याने ) फिर्याद, अर्ज, दाद, अहो माझी गरीब बापडीची कोणी फिर्याद ऐकतं का, कोणी माझी दाद घेतं कां! हाच श्रीमंतांचा दरबारना ! इथं माझी काही तरी दाद लागेल. अहो या अनाथ अबलेची कोणी दाद घ्यावो हो घ्या. एक शिपाई-[ पुढे होऊन ] अरे ही कोण वेडी येथे आली. अग चल हो पाठीमागें ! सत्यभामा-कारे बाबा, मला पाठीमागे हो ह्मणून ह्मणतोस! मला श्री