पान:माधवनिधन.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिनंबर १८९९] माधवनिधन. नाना-बाबूराव, आतां श्रीमंतांची प्रकृती किंचित बरी आहे, नाहीं ! आप्पांनी चांगलीच हुशारी केली ह्मणायची नाही तर अनर्थच झाला असता. बाबूराव-अनर्थ ह्मणजे कसला! वर तोंड काढायला जागा नव्हती. . नाना-सर्व त्या सिद्धिविनायकाला आणि जगदंबेला काळजी. असो, ( सुस्कारा टाकतो.) बाबूराव-मुद्रा जरा शांत दिसते, पण चेहेऱ्यावर जो उदासपणा दिसत आहे, तो आहे तसाच कायम आहे. उत्साह मुळीच दिसत नाही. माधव-(खिन्न वदनाने, औदासिन्ययुक्त हांसून आपल्याशी) एका बाजूला बाबासाहेबांना, दुसऱ्या बाजूला आप्पासाहेबांना घेऊन मी आज या गादीवर बसलो असतो तर या गादीला मग जशी शोभा आली असती तशी शोभा सध्यां मुळीच नाही. बाबासाहेबांच्या आणि आप्पाच्या मनांतून ही दसयाची स्वारी पहाण्याला येण्याचं फार होतं, आणि त्यांनी तसं आपल्याला एका पत्रांत कळविलंही होतं; पण मी आहेना अभागी, अशा रितीनं आजचा दसऱ्याचा दिवस साजरा करण्याचं, व तें सुख अनुभवण्याचं माझ्या कुठं नशिबी आहे. माझ्या मनाप्रमाणं जर सर्व घडून येतं तर आज जिकडे तिकडे आनंदी आनंद, चहूंकडे मजा, बहार उडून गेली असती. पण तसं कुठं झालं. मी आज अशा थाटानं येथे बसून चैन भोगीत आहे, असं जर बाबासाहेबांस कळलं तर ते मला अप्पलपोट्या, निर्दय, आणि निर्लज्ज असं नाहीं का ह्मणणार ? हो अवश्य ह्मणतील. ते काय पण सर्व जग मला तसं ह्मणेल. कारण माझी कृतीच तशी आहे. बलवंतराव नागनाथ कैदेत पडला आहे, बाबासाहेब, आप्पासाहेब आपापल्या ठिकाणी त्यांचा हिरमोड झाल्यामुळे खिन्न होऊन बसले असतील, आणि मी मात्र इथं चैन भोगीत आहे ! आपल्या आप्तस्वकीयांबद्दल ज्याला वाईट वाटत नाही, ज्याच्या मनांत त्यांच्याबद्दल प्रेम नाही, ज्यांची जो काळजी करीत नाही, आपल्या सुखाचे त्यांना वांटेकरी करीत नाही, त्यांच्या दुःखाचा भाग घेत नाहीं, तो निर्लज, अधमाधम, आणि निव्वळ पशू होय ! माधवा, अधमाधमा, तुझ्यांत आणि पशंत अंतर काय आहे. अप्पलपोट्या, त्यांच्याशी तुझी अशी वर्तणूक! बजे