पान:माधवनिधन.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ ह्मणून श्रीमंत अंबारीतून बाहेर उडी टाकू लागले. इतक्यांत आप्पा बलवं. तानी धरून बसविलं. नानांनी तो सर्व प्रकार पाहिला आणि लागलीच झपाव्याने स्वारी चालवून शमीचं पूजन करून लवकर मागे परतण्याचा त्यांनी हुकूम सोडला. त्या बरोबर पुढची दरवारची तयारी पूर्वीपेक्षां लवकर ठेवण्यास तुमाला कळविण्याकरितां पुढे स्वार दवडला आणि मी लागलाच परतलो. सर्व तयारी आहेना ? दाजीबा-सर्व तयारी आहे ! ह्मणूनच बरं स्वारी सूर्य अस्तापूर्वीच शहरांत आली. नाहीतर शहरांत येण्यास दर वर्षी चार घटका रात्र होते. तर मग आजचा दरवार देखील असाच व्हावयाचा! मोरोपंत-नजराण्याचा आणि सोनं देण्याचा यंदाचा दरबार मोठ्या थाटाचा व्हावयाचा, कारण यंदा आपल्या मराठे वीरांनी निजामावर तसाच जय मिळविला आहे. पण श्रीमंतांची प्रकृती फार नादुरूस्त असल्यानं सर्व जागच्याजागी राहिलं. हा प्रकार पाहून नानाचं मन फारच भयचकित झालं आहे. ते आजचा दरवार कसा तरी लवकर उरकून घेणार. (ऐकल्यासारखें करून) हे पहा, भालदार चोपदार ललकारत आहेत, त्यावरून स्वारी दरबारांत येऊन बसली वाटते. चल, तर पानसुपारीची सर्व तजवीज पाहिली पाहिजे. दाजीवा—हो स्वारी गादीवर येऊन बसलीच चला चला. (दोघे घाइने निघून जातात.) प्रवेश साहवा. स्थळ-दरबारचा दिवाणखाना. पात्रं-श्रीमंत सवाईमाधवराव पेशवे गादीवर विराजमान झाले आहेत. नाना, बाबूराव फडके, एका बाजूला उभे आहेत, दुसया बाजूला मोरोपंत, दाजीबा, इतर सरदार मंडळी उभी आहेत, प्रत्येकजण पुढे होऊन नजराणा -_करीत आहे, भालदार ललकारत आहे म असा पडदा उघडतो.