पान:माधवनिधन.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अवश पाचवा. दिजंबर १८९९] माधवनिधन. प्रवेश पांचवा. स्थळ- शनवारच्या वाड्यांतील दरबार कचेरीच्या बाहेरील दालन. पात्रे-मोरोपंत भावे आणि दाजीबा आपटे येतात. मोरोपंत-दाजीबा, आजचा भयंकर प्रसंग दैवयोगानंच टळला. देवाची कृपा आणि नानांचं दैव सबळ, नाहीतर आज सर्वांच्या तोंडाला काळोखी लागली असती. मला स्वारीतून परत येऊन. दोन तीन घटका झाल्या तरी अद्याप माझी छाती धडधडतच आहे. दाजीबा-मोरोपंत, प्रसंग तसा खरा. पण एकाएकी असं होण्याला कारण काय झालं! . मोरोपंत-आतांशा श्रीमंतांची प्रकृती किती भ्रमिष्ट व किती बेताल झाली आहे ! काही तरी बोलतात, कोणीकडे तरी पहातात, कोणीकडे तरी चाल. तात; मध्येच मोठमोठ्याने सुस्कारें टाकतात, आपल्या शरीराकडे वारंवार पाहतात, ज्याच्या त्याच्यावर रागावतात, अंगावर धावून जातात, असे वेड्यासारखे नाना प्रकार करतात. फार काय सांगावं, माझ्यावर आणि कोंडाजीवर जो एक दोन दिवसापूर्वी प्रसंग आला होता, तोच प्रसंग प्रत्यक्ष बाबूराव फडके यांच्यावर आला होता. आधी स्वारी आज शिलंगणास जाण्यासच उठेना. बाबूरावांनी, मी, आणखी दुसऱ्या मंडळींनी फार विनंति केली त्यावेळी आमां सर्वांवर स्वारी किती रागावली, तो प्रकार तुमाला माहित आहेच. दानीबा-त्यावेळी मी तेथेच होतो. नाना आले तेव्हां स्वारी उठली, त्यावेळी देखील रागांतच होती. मोरोपंत तो प्रकार आणि तोच राग स्वारीत कायम होता. अर्ध्या रस्त्यावर स्वारी गेली असेल नसेल. नानांचा, फडक्यांचा व इतर सरदारांचे हत्ती बरोबर चालत होते. इकडे तिकडे पहातां, पहातां, श्रीमंताची नजर नानाकडे गेली. कांहीं बोलायचे असेल असे समजून नानांनी आपला हत्ती, श्रीमंतांच्या हत्तीजवळ नेला. इतक्यांत कावरी बावरी मुद्रा करून, ' हा मीच येतो' असे