पान:माधवनिधन.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ देऊन मला निव्वळ पाषाण बनलं पाहिजे, पण यशोदे, तुझ्याकरितां तसा प्रेमाचा ओलावा नाही असा मी कोरडा पाषाण कसा बनूं. पण आता मला तसं बनण्यांत बाकी कोणची राहिली आहे. मी तसा झालेला हे तुझे अश्रुच स्पष्ट दाखवीत आहेत. तुझी माझी नजरानजर झाली, तूं मला पाहिलंस, ह्मणून तुला दुःख झालं. तेव्हां माझं दर्शन हेच खरोखर तुझ्या दुःखाचं मूळ. मी जोंपर्यंत तुझ्या दृष्टीस पडलो नव्हतों तोपर्यंत तूं मोठी सुखी आणि आनंदी होतीस. माझं दर्शन झाल्याबरोबर ते तुझं सुख, तो आनंद पार कोणीकडच्या कोणीकडे नाहीसा झाला. तेव्हां तुला जर सुख व्हावं असं असेल तर मला येथून तत्काल तुझें दृष्टीपुढून निघून गेलं पाहिजे त्याशिवाय दुसरा त्याला उपाय नाही. हे अभाग्या माधवा, तूं खरोखर महापातकी आहेस. तुझ्या दर्शनानं, पाहण्यानं, बोलण्यानं, तुझ्याशी सहवास ठेवण्यानं, तुझा आप्त झाल्यानं, आणि तुझ्याशी मैत्री करण्यानं, सर्वांना दुःख होत आहे; असा तूं सर्वांच्या दुःखाचं मूळ जन्माला तरी कशाला आलास ! यशोदे, सर्वांना दुःखदायक असा तर मी झालोंच आहे, पण तुझा हात धरून दुःखसागरांतून मी तुला पार परतीराला नेऊन पोहचवावयाचं माझं कर्तव्यकर्म असतां, आणि ते करीन अशी मी सर्वांसमक्ष शपथ वाहिली असता, या चांडाळ निर्दयाने, तुला, अज्ञान मुलीला फसवून त्या दुःखसागरांत पार बुडविली ग बुडविली. मी तुझा पूर्वजन्मीचा खरोखर वैरी, आणि ह्मणूनच हा असा दावा साधला. या कपट्याचं तूं पुन्हां तोंड पाहूं नकोस, आणि मीही तुला आपलं लोंड दाखविणार नाही. जेव्हा जेव्हां तूं माझं तोंड पहाशील तेव्हां तेव्हा तुझ्या दुःखाला भरतं आल्याशिवाय कधी राहणार नाही. ( झपाट्याने निघून जातो.) यशोदाहे आई जगदंबे, हे कुलस्वामी गणपतीराया, तिकडचं सर्व दु. खणं मला येऊंदे; आणि तिकडच्या प्रकृतीला लवकर आराम पडूं दे. देवा काय दशा झाली ही. (डोळे पुशीत निघून जाते.)