पान:माधवनिधन.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिजंबर १८९९] माधवनिधन. १०७ मुकी, मतिमंद अशी जखड म्हातारी होऊन जा! ह्मणजे तुला मग कांहीं सुख लागलं तर लागेल. तारुण्यावस्था मुळीच तूं पाहूं नकोस. तूं जरा मोठी झालीस ह्मणजे तुला समजू लागेल. तुला समजू लागलं ह्मणजे मंग मात्र तुला तुझी दुःखद स्थिती कळू लागेल. तुझ्या अंगाला बाहेरून विषारी इंगळ्या लागल्यासारखं होईल. तुझ्या दुर्दैवी पतीची तुला खरी स्थिती कळली ह्मणने मग चहूबाजूंनीं रखरखीत पेटलेले निखारे ठेवल्याप्रमाणे तुझ्या मनाला अत्यंत ताप होत जाईल. मनाला ताप झाला की सध्यां में तुझे सुंदर मुखकमल टवटवीत दिसत आहे, ते त्या तापाने अगदी कोमेजून जाईल. आणि तुझ्या अंतःकरणांतील आनंदाचा झरा तो मनाचा ताप शोषून टाकील. यशोदे तर मग तूं अगदी लहान होशीलना ? हो, हो, अगदी लहान लहान हो. तूं लहान झालीस असं मी पाहिलं की मला मोठा आनंद होईल. कारण माझ्यामुळे तुला दुःख होऊ नये अशी माझी मोठी इच्छा आहे. मा. ___ यशोदा-( आपल्याशी) ते पहा माझ्याकडे टवकारून पहात आहेत. मी इथं पहात उभी राहिले ह्मणून स्वारीला राग आला की काय ? पण मला असं नुसतं पहाण्याखेरीज दुसरं काय करितां येतं ! मुद्रा किती तरी भयंकर दिसत आहे. आई-आई-( डोळ्याला पदर लावते.) ___ माधव-(तिच्याकडे पहात आपल्याशी) अरे ही तर रडते आहे वाटतं. ते पहा तिनं आपलं तोंड त्या बाजूला वळवलं. तिनं डोळ्याला पदर लावला. ते पहा गालावर आलेले ओघळ ती आपल्या पदरानं पुशीत आहे. यशोदे, तुला माझी स्थिती कळली ! माझ्या मनाला काय दुःख होत आहे, तुझा पती किती अभागी, किती दुर्दैवी, किती पराधीन आहे हे तुला समजलं वाटतं. हो समजलं! त्याशिवाय तुझ्या डोळ्यांतून अश्रुपात कधीच होणार नाहीं. मनामध्ये अत्यंत गुप्त ठिकाणी काय खलबल चालली आहे हे जाऊन शोधन पाहण्याला आणि मनाची स्थिती समजून घेण्याला हेच दोन मार्ग आहेत, ते सर्व दाखवितात. मला आप्त, इष्ट, मित्र गणगोत वगैरे काही नाही. जर कोणी मला असले तर मी त्यांना विसरले पाहिजे, आणि त्यांच्याबद्दल जर माझें मनांत यत्किचित् प्रेम, दया, माया काही असेल तर ती टाकून