पान:माधवनिधन.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला... [वर्ष ७ च्याकडे पाहून आपल्याशी ) पाहिलं, इतक्यांत शरीर किती उतरलं तें ! कानानं, दुसऱ्याच्या तोंडून ऐकण्यांत आणि आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पहाण्यांत इतकं अंतर ! आणि सर्वजण ह्मणतात की प्रकृती बरी आहे. रोज मान कमी आहे, काय आपलं कपाळ सांगतात. पूर्वीचं तोंडावरचं तेज नाहीसं होऊन ते आतां किती निस्तेज झालं आहे. डोळे किती खोल गेले आहेत. गालावरची हाडं किती वर आली आहेत. बरगड्यान बरगड्या दिसतातग बाई ! स्थिती भ्रांतिष्टासारखी झाली आहे. नाहींग बाई चेहऱ्याकडे पहावतच नाही. खरं काय होत आहे, हे कळण्याला काहीएक उपाय नाही. डोळ्यांनी पाहून आणि सुस्कारे टाकून मनांतल्या मनांतच दुःख करीत स्वस्थ राहिलं पाहिजे; डोळ्यानं, पोटभर आणि स्वस्थपणे पहाण्याची देखील सोय नाही. सध्या जवळपास कोणी नाही तेव्हां डोळे भरून पाहून तरी घेते. । माधव-(तिच्याकडे पाहून ) मनुष्याला त्याच्या कोणच्याही स्थितीत जर कधी काळी सुख लागत असेल, तर ते त्याच्या लहानपणांत आणि त्याच्या अज्ञान अवस्थेतच. म्हातारपणची स्थिती कांहीं बरी! त्या स्थितीत बाहेरचा फारसा त्रास होत नाही. कारण त्यावेळी बहुतेक बाह्य इंद्रियांनी सोडलेलं असतं; पण त्याही स्थितीत फारसं सुख नाही. इंद्रियाचे बाहेरचे सर्व व्यापार सुटले ह्मणजे मनाचे व्यापार जसे मग झपाट्याने चालतात तसे पूर्वी चालत नाही. त्यामुळे त्या स्थितीत सर्व जन्मांत केलेल्या, घडलेल्या गोष्टीच्या स्मरणानं मनाला अतिशय ताप होतो. मनाला ताप झाला की समाधान नाही, आणि जेथे समाधान नाही तेथे सुख कुठलं. जर त्यावेळी पूर्वीची वि. स्मृती होईल तर मात्र त्यांत कांही तरी सुख लागण्याचा संभव आहे, आणि तेव्हांच लहानपणची आणि म्हातारपणची स्थिती सारखी समजायची. पण मधली तारुण्यावस्थेची स्थिती मात्र अतिशय वाईट. त्या स्थितीत सुखाचा वारा कधीही कोणाला लागण्याची आशा नको. सर्व में कांही सुख दुःख होतं त समजू लागल्यावरच. तेव्हां यशोदे, तूं अगदी लहान हो, तुला जर आता कांहीं समजत नसेल तर सध्यां आहेस तेवढीच रहा; अथवा एकदम सर्व इंद्रियांनी सोडलेली, पूर्वीची आठवण नाहीशी झालेली, अशी आंधळी, बहिरी,