पान:माधवनिधन.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०५ दिजंबर १८९९] माधवनिधन. मैना-बाईसाहेब, सरकार भ्रांतिष्टासारखं करतात. औषध फेंकन देतात आणि ज्याच्या त्याच्यावर रागावतात; पण आज कालच्यापेक्षा काही कमी आहे. नवरात्र आहे तेव्हां देवीला एखादा नवस नवसा. मी देखील एक नवस करते. हे आई भवानी, आमच्या सरकारास लवकर आराम पडूंदे ह्मणजे मी तुझ्या नावानं दहा सवाष्णीस जेवायला घालीन. .. यशोदा-मैना, मी शेकडों नवस केले आहेत. तिकडच्या प्रकृतीचं मान रोज कमी व्हावं हेच मला ऐकायला पाहिजे. ( आपल्याशी ) जगांत आमचं सर्वस्व काय ते ते ! मी लहान ह्मणून मला जवळ जाऊन काय होते ते विचारता येत नाहीं; काही उपाय करता येत नाही, कोणाला एकदम उघडपणे काय होत आहे याची चौकशी करतां विचारता येत नाही, डोळे भरून पहातां सुद्धां येत नाही, कारण निर्भीड आणि दांडगी असं लोक ह्मणतील की काय ही भीति. सगळा मेला चोरटा व्यवहार. काळजी करायची झाली तरी सुद्धां ती चोरूनच केली पाहिजे, आणि घरांतील चार मंडळी जे कांहीं बोलतील तें चोरून ऐकून त्यांत जर काही कळलं तर त्यावरच समाधान मानून राहिलं पाहिजे. मनाला दुःख होण्याजोग जर काही कळलं तर तें दुःख बाहेर दाखवितां देखील कामा नये, उलट आनंदच दाखविला पाहिजे. सगळ्याची मेली चोरी आणि नेहमी दुसऱ्याच तोंडानं पाणी प्यायचं. आमा लहान मुलींची ही स्थिती किती वाईट. आमी लहान ह्मणून आमाला कां मन नाहीं, की दया नाही, की आझाला आमच्या माणसाची काळजी वाटत नाही, की आमाला काय होत नाही. तहान, भूक ज्याला लागते त्याला आपलं बरं वाईट सगळं कळतं; सुख, दुःख होते, राग, लोभ येतो, सर्व काही लहानाला मोठ्या माणसाप्रमाणेच होतं; पण मेलं ते बाहेर दाखविण्याची चोरी आहेना ! डोळे भरून पाहीन झटलं तर ते देखील करतां कामा नये. चोरून लपूनच पाहिलं पाहिजे. (इतक्यांत माधवराव येतात.) मैना-बाईसाहेब, ती पहा स्वारी आली. चला या इकड़न अशा. यशोदा-चल पुढे हो, ही मी अशी इकडून येते. ( ती जाते ) ( त्या