पान:माधवनिधन.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०४ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ प्रसन्न होऊन तिचा पती तिच्या स्वाधीन केला; पण हा मेला मनुष्य असून त्या निर्दय काळापेक्षा देखील निर्दय आहे. तिकडे आजपर्यंत नानाची किती थोरवी गाणं होत असे, नानाला किती देवाप्रमाणे भजत असत, तोच बरं आपला हा आजपर्यंत पुजलेला देव; आणि त्याचीच ही आपल्यावर कृपा. मेला नुसत्या काळ्या दगडापेक्षां देखील दगड आहे. इथं दाद लागत नाही तर प्रत्यक्ष ज्यांचा त्यांनी गुन्हा केला आहे त्याच्याजवळ दाद मागेन, आणि या कुटिल कारभाऱ्याचं मन किती काळं आहे. हे त्यांना आणि सर्व जगाला दाखवीन; त्याशिवाय मला आतां दुसरा उपाय राहिला नाही.(जाते) प्रवेश चवथा. स्थळ-वाड्यांतील देवीचे माजघर. पात्रं-यशोदाबाई आणि मैना येतात. यशोदाबाई-- ( आपल्याशी ) हे आई, जगदंबे, कोल्हापुरचे महालक्ष्मी तुझ्या उत्सवाचा आजचा नववा दिवस आहे. चहूंकडे तुझे होम, हवन, उत्सव मोठ्या कडाक्यानं चालले आहेत. कित्येक स्त्रियांच्या अंगांत येऊन तूं आपला साक्षात्कार दाखवीतेस; आणि सगळ्यांचं पुढचं बरं वाईट सांगतेस, तर मग मला कां बरं तूं आपला साक्षात्कार दाखवित नाहीस? हे माते, तूं जर माझ्यावर रागावलीस तर मग माझे कसे होणार ! मी लहान आहे, अ. ज्ञान मूल आहे, माझ्या हातून जर तुझा एखादा चुकून अपराध झाला असल तर तो मला क्षमा कर. मी तुझ्या कृपेस पात्र आहे. तिकडची प्रकृता जी अगदी बिघडली आहे, जेवण नको, खाणं नको, झोप नको, कांही एक नसो, अशी जी भ्रांती झाली आहे, ती सर्व नाहींशी कर; ह्मणजे पुढील वर्षी तुझा उत्सव मी दुप्पटीनं करीन. हजारो सवाष्णीस तुझ्या नावान साभाग्य वायनं देईन. तुझ्या कृपेनं मला सर्व काही अनुकूल आहे. तिकडचा प्रकृती लवकर बरी होऊ दे, याशिवाय माझं तुझ्याजवळ कांही एक मागण नाही. (मैनाकडे पाहन) मैना, आतां प्रकृती कशी ग आहे. तू खबर आणलीस का?