पान:माधवनिधन.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिजंबर १८९९). माधवनिधन. १०३ 'सत्यभामा-नानासाहेब, परमेश्वर काही लांब नाही बरं! मला तरी त्यांच्या जवळ राहूंद्या; ह्मणजे मी त्यांची थोडीबहुत तरी सुस्रुषा करीन. पोट जळत नाही ह्मणून मी आपल्याकडे आले नाही. त्यांच्यावर आपण कांहीं दया करावी ह्मणून मी आपल्याकडे आले. मला दुसरं काही आपल्याजवळून नको आहे, ज्यानं जन्माला घातलं आहे आणि पोट दिलं आहे, तो आजच कांही निजला नाही किंवा मेला नाही. त्यानं काही तरी त्याची तजवीज केलीच असेल. - नाना-परमेश्वर लांब असो अगर जवळ असो, पोटाची मात्र तजवीज होईल, यापेक्षा जास्त सध्यां कांहीं एक होत नाही; आणि तुमच्या विनंतीचाही काही उपयोग व्हावयाचा नाही. लाखो मनुष्यांच्या पालनवाल्याला एकाच्या दुष्ट कृतीमुळे ताप होऊन जर लाखो माणसांना दुःख होत आहे, तर त्यांच्याकरितां त्या एकट्या हरामखोरानं दुःख भोगलं तर कांहीं एक वाईट नाही. तो तेथेच सडत पडला पाहिने. समजलांत बाई. जा. ( नाना आणि मोरोपंत निघून जातात.) सत्यभामा—नानासाहेब, आपल्यासारख्या मांगहृदयी मनुष्यानं दिलेलं अन्न मीही घेणार नाही. जग आजच कांही ओस पडलं नाही. दारोदार पाहिजे तर भीक मागून आणीन आणि आपल्या पोटाची खळी भरीन; नाही तर उपाशी तरफडून मरेन, पण आपल्यासारख्या निदयाच्या दाराशी पुन्हां कधी येणार नाही. पण एवढं मात्र पक्कं लक्षात ठेवा की, श्रीमंत पंतप्रधान आणि त्यांचे आप्त यांचं सख्य करून दिल्याबद्दल आपल्यासारख्या कुटिल मंत्रयाला राग येऊन राजद्रोहाचा तर नाहीच, पण मंत्रीद्रोहाचा गुन्हा के. ल्याबद्दल एका गरीब मनुष्याला किती यातना भोगाव्या लागत आहेत, व पेशवाईत आणि नानासारख्याच्या कारभारांत कसा न्याय होत आहे हे मात्र सर्व लोकांच्या नजरेस आणून दिल्याशिवाय मी राहणार नाही. ( आपल्याशी ) अरे मांगा, कुटिला, निईया, काही तरी तुला दया यायची होती. प्र. त्यक्ष निर्दय काळ देखील, सती सावित्रीनं आपल्या पतीच्या प्रागाकरिता त्याची करुणा भाकिली असतां, द्रवला; त्याला त्याची दया आली आणि त्यानं