पान:माधवनिधन.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ पहावत नाही, ते एक नाहीसं तरी होईल, अपराध्याला योग्य शिक्षा दिल्याबद्दल आपल्या मनाची तृप्ती होईल, जगाला आपला खरा दयालुपणा आणि न्यायीपणा दिसेल, आणि स्त्रियांना सौभाग्यपणांत मरणांत जे सर्वांहून जास्त सुख व भूषण आहे, ते मला अनायासेंच आपल्या कृपेमुळे लाभेल. आपल्या पतीच्या आधी स्त्रियांना मृत्यू येणं यापेक्षा जगांत स्त्रियांना दुसरी कोणतीच गोष्ट आनंदाची नाही. नानासाहेब, द्या हुकूम. जितकं लवकर मला त्यांच्या आधी मरण येईल तितकं मला चांगलं; आणि तितक्या माझ्या मनाला होत असलेल्या यातना तरी कमी होतील. हं.. - नाना-एका मनुष्याच्या अपराधाबद्दल दुसन्याला शिक्षा देणे अगदी गैर, त्यांतून स्त्रियेला शिक्षा देणं त्याहूनही अयोग्य. शिक्षा ज्याची त्यांनंच भोगिली पाहिजे. सत्यभामा-त्यांच्यावर प्रसंग आल्यामुळे आमी दीन होऊन दारोदार लागलो आहोत. मी पदर पसरते, हात जोडते. येऊंद्या, थोडीशी तरी दया येऊया. याबद्दल आपल्याला देखील एखादे दिवशी देवापाशी जाब द्यावा लागेल. नाना-त्यानं पूर्वी जी सरकारची नौकरी बजाविली आहे, तेवढ्याबद्दल त्याच्या कुटुंबाच्या पोटापाण्याची मात्र सरकारांतून तजवीज केली जाईल. समजलांत बाई. ( इतक्यांत मोरोपंत भावे लगबगीने येतात.) मोरोपंत -( हात जोडून ) आजच्या इतकी श्रीमंतांची प्रकृती कधीच बेताल झाली नव्हती. वैद्याचं औषध घेतलं नाही इतकंच नव्हं, तर त्यांनी आमा सर्वांना हाताला धरून तेथून काढून लावलं. औषध फेंकून दिलं. स्थिता फारच भ्रमिष्ट झाली आहे. आजच्या कृतीवरून उद्या काय होईल हे खांगवत नाही. आपण एकदां तिकडे चलावं. नाना - ( संतापाने ) आणखी काय काय होणार आहे, काही कळत नाही. बाई, हे सर्व आपल्या यजमानाच्या कृतीमुळे. जो सर्वांच्या दुःखाला कारण झाला त्याला ती शिक्षा ह्मणने कांहींच नाहीं. हरामखोरा, भोग आपल्या कर्माची फळं.