पान:माधवनिधन.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिनंबर १८९९] माधवनिधन. १०१ आपणच करावा. मला वाटते त्याला नुसता हत्तीच्यापायीं देऊन अगर दुसऱ्या एखाद्या प्रकाराने एकदम ठार मारून टाकण्याची शिक्षा देऊन उपयोगी नाही, तर त्या मेस्याला हाल हाल करूनच ठार मारण्याची शिक्षा दिलीं याहिजे. एखाद्या कुटुंबाची वाताहत करणारा, त्यांतील बायकांमुलांस देशोधडी लावणारा, दीनवाणीनं जी त्याच्यापुढे तोंड वेगाडण्यास आणि दया करा ह्मणून ह्मणण्यास आली असता, त्यांची ती दीन स्थिती पाहून न द्रवणारा, तो मेला मांगहृदयी नाही तर कसा? त्याचं हृदय काळ्या कुळकुळीत फत्तराचंच असलं पाहिजे. अशा माणसाला माणुस ह्मणण्यापेक्षां राक्षस मटलं तर फार चांगलं होईल. नानासाहेब, पागेदारानी राजद्रोहाचा गुन्हा केला नाही. ते श्रीमंताच्या आज्ञेप्रमाणेच चालत होते. राजद्रोहाचा गुन्हा कोण करीत आहे आणि श्रीमंताच्या मर्जीविरुद्ध कोण वागत आहेत, याचा प्रथम आपण आपल्या मनाशी विचार करा. आपल्यासारख्या मोठ्या लोकांनी भलतंच करून आमा गरीब कुटुंबाची दैना करूं नये. देव सर्वांना पहात आहे. नाना त्याला झालेली शिक्षा त्यानं जन्मभरपर्यंत भोगलीच पाहिजे. सत्यभामा-नानासाहेब, इतके निष्टुर नका होऊ! या आमां दोघा दीनाकडे पहा. यांच्याकडे पाहून तरी आपल्याला दया येऊ द्या. तिकडची प्रकृती इतकी अशक्त झाली आहे की, त्यांच्यानं त्या वजनदार बिड्यांचं ओझं आतां मुळीच सहन होत नाही. एक घासभर त्यांना अन्न जात नाही, की त्यांच्यानं एक पाऊलही उचलवत नाही. . नाना-कांही झालं तरी त्यांत आतां बदल होणार नाही. सत्यभामा-त्यांच्याबद्दल मी शिक्षा भोगते. त्यांच्या जागी मला ठेवा, पण त्यांना सोडा. मला वाटेल ती शिक्षा देऊन आपल्या मनाची तृप्ती होत असेल तर ती खुशाल करून घ्या. अगदी कसर करूं नका. नाहीतर उगीच आपल्या मनाला जन्मभर तळमळ लागेल. ही सत्यभामा, त्यांच्याकरिता वाटेल तें दुःख भोगायला तयार आहे. त्यांच्या अपराधाबद्दल आपल्या मनांतून त्यांना जी मृत्यूची शिक्षा द्यावयाची आहे ती मला द्या, ह्मणजे त्यांत दोन्ही तिन्ही कामं एकदमच सावतील. त्यांना होत असलेलं दुःख में मला