पान:माधवनिधन.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. 1 [वर्ष ७ च्या राज्यांत अपराध्याला मृत्यूची शिक्षा राजद्रोहाखेरीज होत नाही. जें काम करायला नको होतं तें त्यानं चोरून केलं. सत्यभामा-श्रीमंत आणि बाजीरावसाहेब यांचा निरोप एकमेकांला पोहचविणे, त्या दोघांचं सख्य करून देणं, हे काम त्यांनी करायला नको होतं, ते त्यांनी केलं ह्मणून त्यांना जन्मभर कैद होय ? नाना-होय तेवढ्याचकरितां ? सत्यभामा-पण तें श्रीमंत सरकाराला पसंत होतं की नव्हतं ? जर सरकाराला ती गोष्ट आवडत होती, त्यांना ती गोष्ट माहित होती, मग ते सरकारचे गुन्हेगार कसे, आणि त्यांच्याकडून राजद्रोहाचा गुन्हा घडला कसा ! नाना-पण मी त्यांची त्या कामावर योजना केली नव्हती. त्याला सांगितलेली कामगिरी त्यानं बजाविली नाही. भलतंच केलं ह्मणून त्याला शिक्षा झाली. सत्यभामा-श्रीमंतांची आणि बाजीरावाची ह्मणने चुलत्याची आणि पुतण्याची नुसते निरोप कळवून ओळख करून दिली, आप्ताआप्तामध्ये सख्य करून दिलं, आणि ही गोष्ट यजमानाच्या संमतीनं झाली; असं असून त्या ओळख करून देणाऱ्या माणसाला जन्मभर कैदेची शिक्षा काय ? हा पेशवाइंतला सुरेख न्याय आज जगाला नवीनच कळला ह्मणायचा ! आपल्या दूरच्या एखाद्या आप्ताची जर दुसऱ्या कोणी मनुष्यानं ओळख करून दिली तर नानासाहेब आपण त्याला राजद्रोही ठरवून जन्मभर कैदेचीच शिक्षा देणार तर मग ? आजपर्यंत अशा चांगल्या कामांत मध्यस्थी करणाऱ्या मनुष्याला माठे लोक इनाम देत असत, पण आता त्यांना त्याबद्दल कडक शिक्षा हो- . तात, या त्यांच्या मोठेपणाला काय ह्मणायचं. श्रीमंतांची आणि बाजीरावाची ओळख करून देणारा मनुष्य जर राजद्रोही, मांगहृदयी, विश्वासघातका असा ठरतो, आणि त्याला अंधारकोठडीत सारा जन्म घालविण्याची शिक्षा मिळते, तर त्या दोघांमध्ये वितुष्ट पाडणारा, त्यांच्यामध्ये बिब्बा घालणारा, त्याच एकमेकांना नुसते निरोप देखील नकळं देणारा मनुष्य किती विश्वासघातकी, किती मांगहृदयी, व राजद्रोही असावा; याचा विचार नानासाहेब,