पान:माधवनिधन.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिजंबर १८९९] माधवनिधन. प्रवेश तिसरा. स्थळ-नानांचा वाडा. पात्र-नाना आणि वलवंतराव नागनाथाची बायको सत्यभामा. नाना-बाई, तुमची दुसरी जर कांही विनंति असती, तर मी ती मोठ्या आदराने मान्य केली असती, व अजूनही करीन. त्या बेइमान, हरामखोरानं, फितुयानं, असलं भयंकर कृत्य केलं आहे की, ते सांगता येत नाही. त्याचा दुर्धर परिणाम मात्र आह्मां सर्वांला भोगावा लागत आहे. त्याच्या एकट्याच्या एका दुष्ट कृतीमुळे इथं जे रोज अनर्थ उसळून गेले आहेत, ते पाहिले ह्मणजे असं वाटतं, आणि त्या फितु याबद्दल इतका संताप येतो की, त्याला याहूनही कडक शिक्षा करावी. त्याच्या अपराधाच्या मानानं शिक्षा भोगायला त्याचा एक देह पुरेसा नाहीं; आणखी जर असते तर फार चांगलं झालं असतं; ह्मणजे त्या सर्वांना शिक्षा देऊन मी आपल्या मनाचं समाधान मानन घेतलं असतं. त्याचं नांव निघालं की अंगाची आग होऊन जाते. अरे मांगा बेरडा सत्यभामा-शिव, शिव, या कानांनी या शिव्या ऐकवत नाहीत. ( रा. गानें ) पण त्यांनी असा सरकारचा कोणचा मोठा गुन्हा केला आहे ? उलट त्यांनी तर आजपर्यंत सरकारची कामगिरी मोठ्या इमानदारीने केली आहे. नाना-त्यानं पूर्वी फारच चांगली कामगिरी केली. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता; पण अखेरीस त्या गुलामानं माझ्या विश्वासाचं मला चांगलं फळ दिलं, ह्मणून त्यालाही. पण त्याच्या कृती योग्य फळ देणे मला भाग पडले आहे. एखादा प्रत्यक्ष गळेकापू , दरोडेखोर पतकरतो, पण हा असला विश्वासघातकी, केंसानं गळा कापणारा मुळीच उपयोगी नाही. त्याला हत्तीच्या पायाला बांधून ठारच केला असता, पण काय करूं ब्राह्मण पडला, आणि त्यानं पूर्वी चांगली कामगिरी केली मगून सोडला. सत्यभामा-त्यांना मृत्यूची शिक्षा कशाबद्दल ! नाना--कशाबद्दल ! विश्वासघाताबद्दल, आणि राजद्रोहाबद्दल. पेशव्यां