पान:माधवनिधन.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ द्धीवर आल्यासारखे करून ) अरे हा माझा जिलवग स्नेही बाबूराव ! या निर्मळ अंतःकरणाच्या, व खऱ्या मित्राशी मी असा मूढाप्रमाणे अती प्रसंग केला अंः ! अरेरे, मित्रा ( त्याला जाऊन कवटाळतो) काय ही माझी स्थिती! मी मूढ, पशू, कान असून बहिरा, डोळे असून आंधळा, बुद्धि असून मतिमंद असा सध्या झालो आहेरे ! तुझ्यासारख्याशी मी अशा रितीने वागलो. सर्वांपेक्षां पूज्य, आणि प्रिय मित्राच्या प्रेमाची मी भ्रमिष्टाने अशी पारख केली, ज्या मित्रस्थानापासून माझ्या मनाला आनंद, सौख्य, विश्राम मिळणार त्या स्थानाची अमर्यादा करून मी आपल्या हाताने आपल्या मनाला संताप करून घेतला, आणि तुला दुःख दिले. मित्रा, मला क्षमा कर. मी चुकलो. ( हात जोडतो.) बाबू०–श्रीमंत हे काय हे ? ( त्याला वर उचलतो.) .. माधव-( त्याला मिठी मारून ) काय करूंरे, त्या सर्व हरामखोरांनी नानात-हेची सोंग आणून, भलभलतें बोलून, नाही ते व्हायला सांगून मला अगदी त्रासवून सोडलं आहे; शिवाय प्रत्येकजण श्रीमंताची काय आज्ञा आहे ह्मणून हात जोडून ह्मणायला तयार ! जी गोष्ट त्यांच्या मनांतून करायची नसते, ती करायला तयार आहोत असं दाखविण्याची सोंगं त्यांना कशी आणतां येतात, याचंच मला आश्चर्य वाटतं, आणि याच त्यांच्या कृतीचा मला अत्यंत संताप येतो; आणि त्या संतापाच्या भरांत माझ्या हातून भलतेच होऊन जातं. हे सर्व जिवलग स्नेहाजवळ ह्मणून मी सांगितलं. पण त्याच्याशी तरी मी कुठं नीट वागलो. त्या माझ्या कृतीचं मला स्मरण झालं ह्मणजे मला तुला तोंड दाखवायला शरम वाटते. नको तुझ्यासारख्या परोपकारी महात्म्याला माझ्यासारख्या पातक्याचं दर्शन सुद्धां नको. हा मूढा, माधवा-चल-चल-नीच-येथून. ( जातो.) बाबू-यांच्या भ्रमिष्ट स्थितीमुळे, जितकं दुःख होतं तितकं दुःख कशानं होत नाही. याला काय उपाय ! देवा तूं समर्थ आहेस. करशील त खरें. ( जातो.)