पान:माधवनिधन.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिजेंबर १८९९] माधवनिधन. बाबूराव—सरकार तेंही होणं शक्य नाही. माधव-सर्व गोष्टी जेव्हां तुह्मी नाही ह्मणतां तेव्हां तुह्मी एक तुमच्या गुरूचे खरे चेले तरी नसले पाहिजेत किंवा तुमच्याकडे आज प्रत्येक गोष्टीचा नकार बोलण्याचीच कामगिरी तुमच्या गुरूने सोपविली असली पाहिजे. बोला तुमच्याकडे कोणची कामगिरी सोपविली आहे. ही की ती. फार करून तुमच्या गुरूने में तुह्माला आज सोंग आणायला सांगितले आहे त्याच सोंगाची तुह्मी बतावणी करीत आहांत; तेव्हां इतर मदतनीसांची जशी मी मघाशी संभावना करून बोळवण केली, तशीच तुमचीही करतो. हरामखोरानों निघा माझ्या समोरून. तुह्मी फार खेळ खेळतां. माझ्या आप्तासंबंधानं होण्यास जमा मला त्या आजोबांनी उपदेश केला, तसा मी त्यांच्यासंबंधानं तर होणार नाहीच पण तुमच्या संबंधानं मात्र होईन. निघा, निघा, माझ्या डोळ्यासमोरून, नाहीतर हाडेंच मोकळी करीन. (त्याच्या अंगावर धांवतो ) बाबूराव-( जागीच उभा राहून ) माझ्या रक्तपातानं जर श्रीमंतांच्या मनाला होत असलेला ताप शांत होत असेल, आणि त्यांच्या प्रकृतीला आराम होत असेल तर तो याक्षणी करण्यास हा बाबूराव फडके तयार आहे. फडक्यांच्या कुलांतील प्रत्येक मनुष्याच्या अंगांतील रक्त, मांस, हाडे, त्वचा त्यांच्या देहाचा प्रत्येक अवयव, त्यांचे पंचप्राण पेशव्यांच्याच अन्नाने वाढ. लेले आहेत, त्या सर्वांचा उपयोग पेशव्यांच्या गादीच्या सेवेकरितांच व्हावयाचा आहे. आमचे देह त्या कामाला आतां लागले काय, किंवा उद्यां लागले काय सारखेच. त्यांचे ब्रीदच ते आहे. सरकार, या देहाचा वाटेल तसा उपयोग करून घ्यावा. आपल्या पुत्राचाही देह सरकारकामी आला हे पाहून स्वर्गस्थ असलेला तात्यासाहेबाचा चिरात्मा तरी संतुष्ट होईल. ( मान पुढे करून उभा राहतो.) माधव-( आपल्याशी ) माझा राग इतका अनावर झाला असतां विटाईने उभा राहणारा हा दुसराच कोणी असला पाहिजे. त्यांच्या मदतनीसापैकी नसेल, नाहीतर त्या चेल्याप्रमाणे हाही चेला आपल्या वस्तादजीकडे वर्दी देण्याकरितां लागलाच धांवत गेला असता. तर मग हा कोण वर ( श