पान:माधवनिधन.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नवंबर १८९९] माधवनिधन. तुमच्या वृद्ध वस्तादजीनं तुझी जे असाल ते नसण्याची आणि नसाल ते होण्याची विद्या अद्याप शिकविली नाही? बाबराव-मला माझ्या वडिलांनी तात्यासाहेबांनी श्रीमंतांच्या गादीची सेवा एकनिष्ठपणे करण्याचं, आणि तेवढ्याकरितां, आपली धन दौलत, अखेरीस हे डोके देखील वेळ प्रसंगी आपल्या मालकाकरितां, आपल्या महाराष्ट्र राज्याकरितां, आणि महाराष्ट्र देशाकरितां देण्याचं शिकविलं आहे. त्याशिवाय मला कोणी काहीएक शिकविलं नाहीं; आणि कोणी शिकविलं तरी मी शिकणार नाही. माधवराव—तर मग तुझी तुमच्या वस्तादजीचे प्रिय व पट्ट चेलेच नाही. नाहीतर त्या वृद्ध सद्गुरुंनी आपली मुख्य गुरुकिल्ली सांगून व ती मुख्य विया पढवून तुह्माला आपल्याप्रमाणेच करून सोडलं असतं. बाकींची सर्व मंडळी मात्र आपल्या वस्तादनीच्या तोडीची झाली आहे. कोणी वैद्य बनतो, कोणी हुजऱ्या बनतो, कोणी कारकून बनतो, कोणी मंत्री बनतो, कोणी इमानदार जिवाला जीव देणारा आणि आज्ञाधारक चाकर बनतो, ज्याला में वाटेल तें तो रूप घेऊन वस्तादजीच्या हुकूमाप्रमाणे आपल्या सोंगाची बतावणी करण्यास तयार होतो. सर्व मंडळी एकच. सोंगें मात्र निरनिराळी. त्या सोंगापैकी तुह्मी कोणचं सोंग आणतां! बोला बोला लवकर. बोलतां की नाही? बाबूराव-सरकार मला काहीएक आपल्या चरणसेवेखेरीज करता येत नाही. माधव-तुह्माला करायला येत नसेल तर वस्तादजीकडे जाऊन शिका. ते तुमाला छान तरबेज करतील. त्यांना आपल्याप्रमाणे आपले चेले तयार करण्याची किल्ली मोठी छान माहित आहे. समजलात कां ? तुह्माला तिकडे जाण्याची इच्छा नसेल, तर मी सांगतो तुमाला तुह्मी कसं व्हावं तें ! त्यानं मला आपला चेला बनविण्याकरितां एक गुरुमंत्र दिला आहे, तो मी तुह्माला सांगतो. मी काही त्याप्रमाणे झालों नाही, कारण तो माझ्या मनांत नीट ठसला नाही. तुमच्या मनांत ठसला तर पहा. पण मी सांगेन तसें ऐकाल की नाही. बोला?