पान:माधवनिधन.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९४ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ गेले असतील. नमस्कार असो या असल्या यमराज सहोदर वैद्यराजांना ! ह्मणे मी दिव्य औषधीचा रस काढून त्यांत मोठी जाज्वल मात्रा उगाळून हे औषध तयार केलं आहे. आधी माझ्या प्रकृतीचं निदान कुठं या मूर्खाला कळलं! त्यांत त्यानं त्या मात्रेबरोबर 'नाना' नामाच्या मात्रेचे वेढे उगाळल्यामुळे ते औषध अगदी निरुपयोगी झालं त्यानं माझ्या अंगाचा नुसता दाहादाहा करून सोडला. या औषधानं मला गुण कसा येणार ! मानसिक रोग जर नाडीने वैद्याला कळतां तर काय पाहिजे होतं ? पण तो सृष्टिकया ब्रह्मदेवाला अथवा प्रत्यक्ष धन्वंतरीला देखील जर कळत नाही, तर या तारतम्यशून्य मूढ वैद्याला कसा समजणार ! माझ्या रोगाची भावना निराळी, त्याचं औषवही निराळं. बाबासाहेबांचा, आप्पासाहेबांचा, बलवंतराव नागनाथाचा आणि माझ्या इतर आप्तांचा बंदीवास केव्हां नाहीसा होईल, मी त्यांस स्वतंत्रतेने आपल्याजवळ केव्हां ठेवून घेईन, हा मला जडलेला रोग; बाबासाहेबाचं दर्शन, त्यांचा सहवास, त्यांची मैत्री या औषधाशिवाय कधीही जाणार नाही ! हे औषध ज्याअर्थी सध्यां दुर्मिळ, त्याअर्थी माधवाला जडलेला रोगही असाध्यच! त्या वृद्ध गारुड्याचे ही सर्व खेळी मंडळी वाटेल तें सांगून कान भरते आणि त्याच्या विलक्षण खेळाने माझ्या मात्र अंगाचा संताप होतो. आतां मात्र मी त्या मंडळीचे खेळ कधी चालू देणार नाही, कोणी काही जास्त कमी केले की लगावलेच कोरडे ! ते वृद्ध आजोबा मला पुन्हा पुन्हां उपदेश करतात की, तुझी त्यांचे आप्त आहांत असे विसरा. ते कसं विसरावं ? [ दुसरीकडे पाहून ] हे एक दुसरे त्या गारुड्याच्या तमाशापैकी खेळे गडी आले त्यांनाच विचारतो. [ इतक्यांत बाबूराव फडके येतात. ] वाबूराव-[ पुढे होऊन हात जोडून ], माधवराव - [एकदम जाऊन त्याचे हात धरतो ] काय हो, तुझी देखील त्या गारुड्याच्या मदतनीसांपैकी एक आहांत, नाहीं कां ? बाबूराव-श्रीमंत, गारुडी कोण ! मला काहीएक माहीत नाही आणि मी कोणाचा मदतनीस नाही. माधवराव-नाहीं कसें ! आहात. मला पक्के माहीत आहे. तुह्माला त्या