पान:माधवनिधन.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नवंबर १८९९] माधवनिधन. ९३ वैद्य - ( मोरोपंतास ) जरा बोटानं ढवळून आणि पूर्व दिशेकडे तोंड करून देवाचें नांव घेऊन द्यावे. माधव- ( हातांतील वाटी हिसकून घेऊन रागाने ) काय हा तुझी तमाशा मांडला आहे. कसलं औषध आहे. काय हो तुमाला समजतं मला काय झालं आहे तें! मला औषधाची जरूर नाही. (वाटी घेऊन फेंकून देतो) ते औषध फेंकून द्या, अगर तुह्माला वाटेल तर तुह्मी घ्या, अथवा वाटेल त्याला द्या. निघा येथून. माझ्या समोर उभे राहूं नका. ( सर्व मंडळी स्तब्ध होतात.) ___मोरोपंत-श्रीमंत_माधव-अरे मूर्खानों, मी तुह्माला हुकूम करीत असतां, तुह्मी मठ्ठासारखे माझ्या समोर ह्मणजे पेशव्यासमोर उभे राहून बोलता. पेशव्याच्या एका चाकरानं त्यांच्या हुकूमाची पायमल्ली केली ह्मणून तुझी सर्वजण जर तसंच करूं लागलात, तर हाडेंच खिळखिळी होतील. साराच तुह्माला तमाशा वाटला नाही. हरामखोरानों तुमीच हा सर्व तमाशा मांडला आहे, चला येथून माझ्या डोळ्यापुढ़न चालते व्हा ! [त्यांना सगळ्यांना हाताला धरून घालवून देतो] आणि आपल्या वस्तादजीला तुमची कशी संभावना झाली तें जाऊन कळवाः मोरोपंत-प्रकृती अगदी बेताल झाली. - वैद्य हे भ्राम, भ्राम झाले. चांगला औषध पाजला पाहिजे, तेव्हां श्रीमंताची प्रकृती बेतावर येईल. कोंडाजी-असंच, जवा तवा खसावसा करून अंगावर येतात. चला, नानासाबासनी समदं जाऊन सांगू चला. ( सर्व जातात.) माधव-(संतापाने ) रोग एक प्रकारचा, आणि त्याला औषध दुसन्याच रोगावरचं ! कोण मूर्ख, गाढव, लोक हे ! रोग्याच्या प्रकृतीचं निदान जर वैद्याला प्रथम बरोबर कळतं, आणि त्याला त्यावर बरोबर औषध देतां येतं, तर कैक रोगी मृत्यूमुखांतून परत आले असते. रोगाची परीक्षा नीट न झाल्यामुळे, वैद्याला तारतम्य ज्ञान कमी असल्यामुळे आणि वैद्याने भलत्याच रोगावर भलतेच औषध दिल्यामुळे कैक बिचारे रोगी यमसदनाला अकालींच