पान:माधवनिधन.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. . [वर्ष ७ स्वरूपाची व अधिकाराची ओळख त्या दिवशी करून दिल्यामुळे माझ्या मनाला झालेला ताप या वैद्याच्या औषधानं नाहींसा कसा होणार ? नाना ह्मणतात की, बाजीराव आणि आप्पासाहेब हे तुमचे आप्त आहेत असें तुह्मी विसरा; ती सर्पाची पिलें आहेत असें माना; कारण माझे बाबा. दादांच्यामुळे अकाली मृत्यमुखी पडले. बाबासाहेब, आणि आप्पासाहेब जर सर्प तर मग मी कोण? मी देखील सर्पच ह्मणायचा! बरोबर आहे. ह्मणूनच हे वृद्ध आजोबा, आपण गारुडी बनून आझाला पेटाऱ्यांत घालून, चांगलं खाऊ पिऊ घालून, आमचा हवा तसा तमाशा जगाला दाखवीत आहेत. पण हे गारुड्या, तुझा तमाशा श्रीमंत सवाईमाधवराव पेशव्याला नको आहे. ते तुझी पुंगी तेव्हांच बंद करतील. ( इतक्यांत वैद्यबोवा हातांत औषधाची वाटी घेऊन मोरोपंत भावे आणि कोंडाजीसह येतात.) ____ कोंडाजी-मोरोपंत, सरकारवारी सवस्थ बसली हाय, मोरो होऊनशानी इनंती करा. मोरोपंत-( पुढे होऊन व हात जोडून ) नानांनी जे तैलंगणांतून अतिउत्तम वैद्य आणले आहेत, व ज्यांनी काल श्रीमंतांची प्रकृती पाहिली, त्यांनी श्रीमंतांच्या प्रकृतीचे निदान ठरवून त्यावर हे औषध तयार करून आणलं आहे, हे श्रीमंतांनी व्यावं असं नानांनी सांगितलं आहे. - वैद्य हे दिव्यौषधीपासून श्रीमंताचे प्रकृतीस आराम वाटेल, असे आमी खात्रीने सांगतो. यांत उत्तम औषधीचा रस काढून दिव्य मात्राही घातली आहे. आमी मोठमोठे रोगी बरा केला आहे. आमच्या औषधाचा श्रीमंतांनी गुण पहावा. माधव-(किंचित रागाने आणि तिरस्काराने) ही त्या गारुड्याची खेळ करणारी मंडळी येऊ लागली आतां खेळ करायला! पण मी आहेना येथे त्यांचा वस्ताद ! मी पंतप्रधान पेशवा या लुच्चा गारुड्याचे हवेतसे खेळ चालू देईन ? कधी देणार नाही. - मोरोपंत-(वैद्याच्या हातांतील वाटी घेऊन ती पेशव्याच्यापुढे करतो) हैं प्यावं !