पान:माधवनिधन.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नवंबर १८९९] माधवनिधन. सख्य करून दिल्याबद्दल नानाचं निष्ठुरपण किती आहे, आणि त्यांचे अंतःकरण दगडापेक्षा किती कठीण आहे, हे निदान साऱ्या जगाला दाखवीन ते. व्हांच ही सत्यभामा राहील. चल जिवा, उठ. हलके हलके अंधार पडेपर्यंत पणें गांठलं पाहिजे. (ती जाते.) मा प्रवश दुसरा. स्थळ- शनवारच्या वाड्यांतील श्रीमंतांचा महाल. पात्रं-श्रीमंत सवाई माधवराव पेशवे बसले आहेत. माधव-[ आपल्याशी ] तापवून लाल केलेल्या डागण्यांनी भाजलं असतां, ते भाजल्याचं दुःख कमी व्हावं ह्मणून पोटांत मोठमोठ्या दिव्य मात्रा, अथवा उत्तम रसायनं दिल्यानं जितका उपयोग होणार, तितकाच काळजाला घरे पाडणाऱ्या वाक्शल्यांनी अंतःकरणाला केलेल्या जखमा भरून याव्या ह्मणून त्यावर रोज औषधोपचार केल्याचा उपयोग ! वात, कफ, पित्त यांच्या दोषामुळे बिघडलेली प्रकृती, वरच्या औषधांनी वैद्य ताळ्यावर आणील; पण मानसिक दुःखानं बिघडलेली प्रकृती प्रत्यक्ष धन्वंतरी खाली आला, आणि त्यानं द्रोणागिरी पर्वतावरील संजीवनी वल्लीचा रस काढून जरी औषध दिलं, तरी ती ताळ्यावर येणार नाही. बाबासाहेबांची, आप्पासाहेबांची, त्यांच्या कुटुंबाची, आणि माझ्या आप्तस्वकीयांची व माझी लवकरच भेट होईल, त्यांच्या सहवासांत मी आनंदानं काळ काढीन, त्यांना जवळ करीन, त्यांना देणग्या देईन, जे जे माझ्या उपयोगी पडले त्यांचं कल्याण करीन; माझ्या पगजाबरोबर आप्पांनी जशी मुतालकी केली, माझ्या आजोबांची भाऊंनी जशी दिवाणगिरी केली, त्याप्रमाणे मी आणि बाबासाहेब एकदिलानं चालून सर्व महाराष्ट्र प्रजेस सुख देऊं, आणि आमच्या वाडवडिलाप्रमाणे पराक्रम करून, श्रीछत्रपतीचा व पेशव्यांचा प्रभाव कसा आहे हे लवकरच दाखवू ; मणून जी माझ्या मनांत मोठी आशा होती, ती आशा सर्वस्वी जिरल्यामुळे, व माझ्या मनांत माझ्या आप्तस्वकीयांच्या प्रेमाचा नुक्ताच उद्भवलेला कोंब जागच्या जागीच खुडून टाकल्यामुळे, आणि माझ्या वृद्ध सद्गुरुंनी मला माझ्या