पान:माधवनिधन.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ ठेचा लागून, बोटं फुटून जरी ती रक्तबंबाळ झाली आहेत; भुकेनं जरी माझे प्राण कासाविस होत आहेत; तरी आपल्याला बंदीखान्यांत होत असलेल्या यमयातनापुढे मला त्याचं काडीमर सुद्धा दुःख वाटत नाही. आपल्यापेक्षा आणि या सोनकुल्यापेक्षा मला माझा जीव मुळीच जास्त वाटत नाही. आपण दोघे सुरक्षीत असला ह्मणने झालं. आपल्याकडे पाहून मी आपले कसेही दिवस लोटीन. माझी धनदौलत, माझा मोठेपणा, माझं माहेर, माझं गणगोत, माझं सुख, सर्व काही आपण आहोत. त्याशिवाय सर्व व्यर्थ. भुकेनं आणि तान्हेनं कळवळून रडून रडून दमून बाळाला आतां झोंप लागली. ( मुलाकडे पाहून ) नीज बरं स्वस्थ नीज. जेवढी वेळ तुला गाढ झोप लागेल तेवढी वेळ तरी तुला भुकेपासून त्रास होणार नाही. बाळा, या रानावनांत कांहीरे मिळत नाही. आतां गांवांत गेलें ह्मणजे तुझ्याकरितां कोणातरी पुण्यवानाची पायधरणी करीन. कोणी तरी या पुण्यांत पुण्यवान प्राणी भेटेल. सर्वच काही नानासारखे पाषाणहृदयीं, निष्ठुर नसतील. गांवांत जाऊन तुझ्याकरितां अन्न अगर दुध मिळेपर्यंत माझ्या अंगाच्या मांसाच्या तुकड्यावर जर तुझी भूक भागत असेल, तर बाळा वाटेल तेथला प्रत्यक्ष काळजाचा देखील तुकडा काढून देण्याला ही तुझी आई मागे घेणार नाही. पण बाळा तसं कुठंरे होतं आहे. भुकेनं कळवळून गेल्यामुळे तूं किंकाळी मारलीस, की माझी आंतडी तटातट तुटतात. माझा अगदी निरुपाय होईपर्यंत आणि प्राणांतापर्यंत यत्न करण्यास मागे घेणार नाही. पुढे तुझा वाली परमेश्वर ! प्रतीकूल दैवाचा वारा एकदां उलट वाहूं लागला ह्मणजे सगळं उलटं होतं. हातांतला अधिकार गेला ह्मणजे मग कोण कोणाला विचारतो. फडणवीसाजवळ लबाड लोकांनी चहाडी सांगितल्यामुळे, तिकडच्यावर हा असा प्रसंग आला; जे नाना तिकडे ह्मणजे अगदी देव असे वाटत होते, त्याच नानांनी ही मांगाची करणी केली. पुण्याप्त जाईन, त्यांची भेट घेईन, एवढी जबर शिक्षा दिली असा कोणचा आमच्या हातून अपराध घडला ते विचारीन; अन्यायाबद्दल प्रथम त्यांच्याजवळ, मग यजमानाजवळ, मग सगळ्या जगाजवळ आणि नंतर परमेश्वराजवळ दाद मागेन; तेव्हां राहीन. पुतण्याचं आणि चलत्याचं, अगर आप्ताआप्तांच