पान:माधवनिधन.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नवंबर १८९९] माधवनिधन. हीस की यांनी तुझ्या नाकांत बेसण घातलीच असे समज. ( एकदम पानावरून उठून जातो.) नाना काय करावें ! जेवणाची ही स्थिती ! प्रकृती बेताल झाली, फारच बिघडली असे वाटते ! त्यांना अन्न नको, मग नानाला तरी ते गोड कोठून वाटणार ! नको. ( सर्वजण उठून जातात.) अंक चवथा समाप्त. अंक पांचवा. . प्रवेश पहिला. स्थळ-पुण्याजवळ मुळामुठानदीच्या काठी एका झाडाखाली. पात्र-सत्यभामाबाई मुलाला घेऊन येते.. सत्यभामा-( आपल्याशी ) माझी परीक्षा पहाण्याकरितांच परमेश्वरानं हा मजवर प्रसंग आणला ह्मणायचा! तेव्हां आतां त्याला भिऊन काय उपयोग ! काही दिवसापूर्वी मी साधारण एका सरदाराची स्त्री होते आणि आता एका फितुरी व बंदीवानाची स्त्री झाले आणि रानोमाळ फिरायला लागले. सर्व संपत्ति, वैभव आणि आमचं पुढील मनोराज्य दूपारच्या सावलीप्रमाणं नाहींसं होऊन दुर्दैवाच्या फेऱ्यांत आह्मीं आतां पुरे सांपडलो आहोत. त्यांच्या बरोबर आमी सरदारीणपणा व वैभव भोगण्यास जर तयार होतो, तर आतां त्यांच्याबरोबर आमाला वाटेल तें दुःख भोगायला, आणि वाटेल ते त्यांच्याकरितां करायला तयार झालंच पाहिजे. ते जर आमच्या हातून होणार नाही तर आमी आमच्या पतीच्या सहचरणी कसल्या! त्यांच्यावर प्रसंग आला असतां, त्यांच्याशी प्रेमानं वागण्यांत, त्याचं दुःख त्यांना न होऊ देण्यांत. आणि त्यांना अशा प्रसंगी धीर देण्यांत आह्मां स्त्रियांना जे खरोखर भूषण आहे, ते लक्षावधी रुपयांचे हिन्यामोत्यांचे दागिने घालून मिरविण्यांत मुळीच नाही. शिवनेरीहून पुण्यापर्यंत येत असतांना या तीन दिवसांत चालन, पा. यांत खडे, कांटे लागून जरी त्यांची अगदी चाळण झाली आहे; वारंवार २३