पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जो काही गदारोळ झाला त्यामुळे, दोन पावलं का होईना, त्यांना मागे यायला लागलं. कोणताही प्रश्न घेतला तर त्याबद्दल सरकारवर आज स्वतंत्र निर्णय करता येत नाही. प्रत्येक वेळी पंतप्रधानांना म्हणावं लागतं, मी विरोधी पक्षांना एकत्र बोलावणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि मग मी निर्णय घेणार आहे.
 राजकीय संतुलन उपस्थित आहे; पण राजकीय परिस्थिती यापेक्षा नाजूक आहे. नुसतं संतुलन आहे एवढंच नाही तर जनता दल किंवा डावे पक्ष असे आर्थिक कार्यक्रम असलेले विरोधी पक्ष हे फार झपाट्याने संपत चालले आहेत. रशिया पडला, रशियाची वाताहत झाली. कम्युनिस्टांनी आता कितीही आव आणला तरी गावोगाव जाऊन ते आता कम्युनिझम चांगला आहे हे कोणत्या आधाराने सांगणार? जेव्हा त्यांच्या मक्का आणि काशीचं दिवाळं वाजलं तिथं बंगालमधले कम्युनिस्ट आता आम्ही काही वेगळी, चांगली व्यवस्था करून दाखवणार आहोत असं सांगायला लागले तरी त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. आता जनला दलाने समजून उमजून आत्महत्या करायचे ठरवले आहे. आज राजकीय परिस्थिती अशी विचित्र तयार होताना दिसते की एका बाजूला अयोध्यावादी, धर्माचं नाव घेऊन पुढे येणारे आणि दुसऱ्या बाजूला सोनियावादी यांच्यातच काय ते राजकारण चालणार आहे, बाकीच्या अर्थकारणाला काही स्थानच राहिलं नाही.
 या राजकारणाचा एक तिसरा, मध्ये घडून गेलेला महत्त्वाचा भाग आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. १९८९ मध्ये आपण असं म्हटलं की शेतकऱ्यांचं एक महत्त्वाचं स्थान आपण निवडणुकीमध्ये तयार केलं.शेतकऱ्यांचे कार्यक्रम घेऊन वेगवेगळे पक्ष पुढे आले; पण तिथेसुद्धा आपली थोडी फसगत झाली. खरं शेतकरी आंदोलन बाजूला राहिलं. विश्वनाथ प्रताप सिंगांनासुद्धा शेतकरी संघटनेने केलेली कर्जमुक्तीची मागणी बाजूला ठेवायला लागली आणि कर्जमुक्तीची कोणती कल्पना त्यांनी घेतली तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी ज्यांना कणमात्र समज नाही त्या देवीलालांची; सगळ्या शेतकऱ्यांचं दहा हजार रुपयांचं कर्ज माफ करायची. देवीलालांचा दुसरा कार्यक्रम काय? तर दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलांमध्ये, जिथं एक जेवण शेतकरी माणसाला १०० रुपयात मिळालं पाहिजे. ही त्यांची सगळ्यात मोठी मागणी. या मंडळींनी सबंध शेतकरी आंदोलन बदनाम करून टाकलं. सगळ्या शहरातली इंग्रजी वर्तमानपत्र जर आपण वाचाल तर देवीलालच बदनाम झाले असं नाही, महेंद्रसिंग टिकैतच बदनाम झाले असं नाही तर जाणीवपूर्वक ही सगळी वर्तमानपत्र देवीलाल, महेंद्रसिंग टिकैत आणि शरद जोशी किंवा

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ५२